हॉटेलच्या वेळेसंदर्भात आज होणार निर्णय?

hotel
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून हॉटेल चालकांसमोर अडचण निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यामुळे पुणे व नागपूर प्रमाणे औरंगाबादमध्ये हॉटेल्स चालकांना दहा वाजेपर्यंत डायनींग सेवा देण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा केली.

नागपूर पुणे आणि औरंगाबाद मधील कोरोना बाधित यांचा पॉझिटिव्हिटी दर किती आहे याची तुलना करून औरंगाबाद मधील हॉटेलची वेळ वाढविण्याचा निर्णय होईल. मुख्य सचिवांशी चर्चा करुन पालकमंत्री आज सायंकळपर्यंत औरंगाबादसाठी निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. औरंगाबादचा कारोनाबाधितांचा पॉझिटिव्हिटी दर कमी आहे त्यामुळे वेळ वाढवून मिळण्याची शक्यता आहे.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पालक मंत्री सुभाष देसाई यांच्याशी हॉटेलची वेळ वाढविण्याबाबत चर्चा केली आहे. हॉटेल व्यवसाय रात्री 10 वाजेपर्यंत तरी सुरू असावा अशी मागणी आहे. सध्या सर्व हॉटेल्समध्ये सोमवार ते शनिवार पर्यंत सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत डायनिंगला परवानगी आहे. रविवारी फक्त पार्सल सुविधा, होम डिलिव्हरी करता येत आहे.