देशात कोरोनाची चौथी लाट येणार ? केंद्रीय आरोग्य सचिव काय म्हणाले जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात कोरोना व्हायरस ओमिक्रॉन व्हेरिएंटची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. शुक्रवारी ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 358 वर पोहोचली आहे. ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या प्रकरणांचा ग्राफ ज्या प्रकारे वर जात आहे, त्यामुळे लवकरच जगात महामारीची चौथी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारतातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर केंद्र सरकारने अलर्ट जारी केला आहे.

आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी शुक्रवारी कोरोनाच्या ट्रेंडबाबत पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले,”जगात 1.5 ते 3 दिवसात ओमिक्रॉनची प्रकरणे दुप्पट झाली आहेत. हे जलद संक्रमणाचा धोका दर्शवते. मात्र, जास्त गंभीर रुग्णांसाठी आणखी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनवर पत्रकार परिषदेच्या खास गोष्टी जाणून घेऊया…

त्यांनी सांगितले की, कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर जग याकडे महामारीची चौथी लाट म्हणून पाहत आहे. त्यांनी सांगितले की, 23 डिसेंबर रोजी जगभरात कोरोनाचे 9 लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, भारतात दोन आठवड्यांसाठी सरासरी नवीन प्रकरणे 7 हजाराच्या जवळपास आहेत. गेल्या चार आठवड्यांपासून दहा हजार नवीन केसेस येत आहेत. मात्र आपल्याला सतत जागरुक राहावे लागते. जगाने कोरोनाच्या चार लाटा पाहिल्या आहेत. भारताने सप्टेंबर 2020 आणि मे 2021 मध्ये दोन पाहिल्या.

जागतिक स्तरावर, पॉझिटिव्हिटी रेट 6 टक्क्यांहून जास्त आहे. भारतात हे प्रमाण 5.3 टक्के आहे, मात्र गेल्या आठवड्यात भारतात ते 0.6 टक्के होते. केरळमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 6.1 आणि मिझोराममध्ये 8.2 टक्के आहे. हे चिंताजनक आहे. दोन्ही ठिकाणी पॉझिटिव्हिटी रेट खूप जास्त आहे. राजेश भूषण यांनी सांगितले की, भारतात दोन आठवड्यांसाठी सरासरी नवीन प्रकरणे 7 हजारांच्या जवळ आहेत. गेल्या चार आठवड्यांपासून दहा हजार नवीन केसेस येत आहेत.

ते म्हणाले,”देशात 20 जिल्हे आहेत जिथे केस पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा जास्त आणि 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे. यातील 9 जिल्हे केरळमध्ये आणि आठ जिल्हे मिझोराममध्ये आहेत. दोन जिल्ह्यांमध्ये 10 टक्क्यांहून जास्त पॉझिटिव्हिटी रेट आहे. युरोप, नॉर्वे, कॅनडा या दहा देशांमध्ये कोविडची सर्वाधिक प्रकरणे ओमिक्रॉनमध्ये आहेत.”

राजेश भूषण म्हणाले की,”WHO ने म्हटले आहे की, कोरोना प्रसार ज्या वेगाने झाला आहे त्याच्या तिप्पट वेगाने ओमिक्रॉन व्हेरिएन्ट पसरत आहे. जगातील 108 देशांमध्ये ओमिक्रॉनची 1 लाख 51 हजारांहून जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे.”ते म्हणाले की,” कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएन्ट डेल्टा व्हेरिएन्ट पेक्षा जास्त संसर्गजन्य आहे. घरातील आणि ओमिक्रॉन पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कात असलेल्या लोकांना याचा जास्त धोका असतो.”

ते म्हणाले की,”भारतातील 183 च्या ओमिक्रॉनच्या विश्लेषणाच्या आधारे असे आढळून आले की, 121 जणांचा परदेशी प्रवासाची हिस्ट्री आहे तर 18 जणांच्या संपर्काचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 87 जणांचे पूर्ण लसीकरण झाले आहे तर 3 जणांना तीन डोस मिळाले आहेत. 7 जणांना लस मिळाली नाही तर 2 जणांना लस मिळाली. 16 लोकं लसीसाठी पात्र नाहीत, ते ज्या देशातून येत होते त्या लसीच्या कॅटेगिरी मध्ये ते पात्र नव्हते. 73 लोकांची लसीकरणाचे स्टेट्स अद्याप माहिती नाही.”

आरोग्य सचिवांनी पुढे सांगितले की,”183 ओमिक्रॉन प्रकरणांचे विश्लेषण केल्यानंतर हे उघड झाले आहे की, 44 जणांनी कोणताही परदेशी प्रवास केलेला नव्हता मात्र ते संपर्कात आले होते. यामध्ये 39% महिला आहेत तर 61% पुरुष आहेत. 30% मध्ये लक्षणे होती तर 70% मध्ये कोणतीही लक्षणे नव्हती.महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत आणखी 23 रुग्णांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 88 रुग्णांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे

Leave a Comment