Wimbledon 2021 : Ashleigh Barty ने रचला इतिहास, 143 वर्षानंतर विम्बल्डन जिंकणारी पहिली क्रिकेटपटू ठरली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । ऑस्ट्रेलियन टेनिसपटू अ‍ॅशलेह बार्टीने पहिल्यांदाच विम्बल्डन 2021 चे विजेतेपद जिंकले आहे. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात बार्टीने झेक प्रजासत्ताकाच्या करोलिना प्लिस्कोव्हाचा तीन सेटमध्ये 6-3, 6-7, 6-3 ने पराभव केला. बार्टीचे हे एकूण दुसरे एकेरीचे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. यापूर्वी 2019 मध्ये तिने फ्रेंच ओपन जेतेपद जिंकले होते.

बार्टी 143 वर्षानंतर विम्बल्डन जेतेपद जिंकणारी पहिली क्रिकेटपटू ठरली आहे. हे ग्रँड स्लॅम जिंकणारी एकंदर इतिहासातील तिसरी क्रिकेटपटू आहे.

सध्याची नंबर वन टेनिसपटू बार्टी होण्यापूर्वी पुरूष एकेरीचे पहिले दोन चॅम्पियनसुद्धा क्रिकेटपटू होते. 1877 चा चॅम्पियन स्पेंसर गोरे आणि 1878 चा चॅम्पियन फ्रँक हाडो हे दोघेही प्रथम श्रेणीतील क्रिकेटपटू होते. 1874 ते 1879 दरम्यान स्पेंसरने सरेसाठी दोन सामने आणि इतर दोन संघांसाठी तीन सामने खेळले.

या दोघांनंतर बार्टी विम्बल्डन जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू आहे. बर्ट्टीने 2015-2016 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या टी -20 बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बेन हीटचे प्रतिनिधित्व केले होते.

2014 मध्ये बार्टीने टेनिसमधून ब्रेक घेतला आणि क्रिकेटमध्ये प्रवेश केला. औपचारिक प्रशिक्षण नसतानाही ब्रिस्बेन हीटने तिला पहिल्या बिग बॅश लीगसाठी साइन इन केले. 2016 मध्ये बार्टी टेनिसमध्ये परतली. परतल्याच्या एका वर्षानंतरच तिने आपले पहिले WTA विजेतेपद जिंकले. 2018 मध्ये यु.एस. ओपन दुहेरीचे विजेतेपद जिंकले. 2019 मध्ये, ती एकेरीत फ्रेंच ओपन चॅम्पियन बनली आणि आता तिने विम्बल्डन स्पर्धा जिंकली.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment