विंग ग्रामपंचायतीची तहकूब सभा 8 सप्टेंबरला होणार : सरपंच शुभांगीताई खबाले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कराड तालुक्यातील विंग येथे ग्रामसभा तहकूब कारणावरून काही ग्रामस्थांनी सोमवारी दि. 30 रोजी येथे निवेदनाद्वारे निषेध नोंदवला. निर्णय कोणाच्या तरी दबावाखाली घेतल्याचा स्पष्ट अरोप त्यामध्ये केला आहे. सह्याचे निवेदन ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे यावेळी दिले आहे. तसेच यावेळी तहकूब करण्यात आलेली सभा पुढे ढकलण्यात आलेली असून आता विंग ग्रामपंचायतीची सभा बुधवारी 8 सप्टेंबरला होणार असल्याचे सरपंच शुभांगीताई खबाले यांनी सांगितले.

सोमवार सकाळी दहा वाजता ग्रामसभेचे आयोजन येथे केले होते. तत्पुर्वी तोंडी व सोशल मिडियावर सभेचे निमंत्रण ग्रामस्थांना दिले होते. काही महत्वाच्या मुद्यावर चर्चा त्यात होणार होती. सदरची ग्रामसभा नियोजीत वेळेत सुरू करून मोजक्याच सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत ती तहकूब केली गेली. ही बाब चुकीची आहे. निंदनीय आहे. कोणाच्या तरी दबावाखाली सभा तहकूबचा निर्णय झाल्याचा अरोप काही ग्रामस्थांनी यावेळी केला. आजअखेरच्या ग्रामसभा या नियोजीत वेळेपेक्षा एक-दोन तास उशिरा सुरू झाल्याचे त्यात म्हटले आहे. ग्रामीण समाज व्यवस्थेवर तुम्ही किमान एक तासाचा कालवधी त्यासाठी घेणे अवश्यक होते. असा मुद्दा निवेदनात उपस्थीत करत कायदेशीर बाबीची आठवण त्यांना होणे आवश्यक होते. असेही त्यात म्हटले आहे.

निवेदनावर उपसरपंच सचिन पाचुपते, ग्रामपंचायत सदस्य बाबुराव खबाले, सदस्य विकास माने, सदस्या विजया कचरे, अश्विनी माने,पुनम डाळे, सपंतराव खबाले, माजी सदस्य भागवत कणसे, संपत खबाले, जयवंत माने, निळकंठ खबाले, राजेंद्र खबाले, जयवंत खबाले, अमोल पाटील, संदीप माळी, अनिल कचरे, भगवान सोनावले यासह तीसवर ग्रामस्थांनी सह्या केल्या आहेत.

कोरम अभावी सभा तहकूब मग चुकीचे काय सरपंच शुभांगीताई खबाले

ग्रामसभा नियोजीत वेळेत सुरू केली होती. यावेळी माझ्यासह सात-आठ ग्रामपंचायत सदस्य व तीन चार ग्रामंस्थ समोर उपस्थित होते. त्यानंतर ग्रामस्थांची पाऊणतास वाट पाहिली. कोरम पुर्ण होऊ न शकल्याने सभा तहकूबचा निर्णय ग्रामविकास अधिकारी यांच्या सल्ल्याने आम्ही घेतला. त्यात चूकीचे काय, अशी प्रतिक्रीया सभेच्या अध्यक्ष सरपंच शुभांगीताई खबाले यांनी यावेळी दिली. तसेच पुढे ढकलेली सभा 8 सप्टेंबरला होणार आहे, असे असल्याचेही सांगितले.

 

Leave a Comment