विप्रो कंपनीच्या उपोषणाकर्त्या कामगारांची प्रकृती खालावली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । एमआयडीसी वाळूज परिसरातील विप्रो इंटरप्राईजेस कंपनीतील कामगारांचा पगारवाढीचा करार १४ महिन्यापासून लांबणीवर पडला आहे. वेतनवाढीचा करार कंपनी व्यवस्थापनाने तत्काळ पूर्ण करून पगार वाढ करावी या मागणीसाठी कंपनीतील कामगारांनी दि.६ मार्चपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणात कामगारांची आज प्रकृती खालावली आहे.

वाळूज एमआयडीसी परिसरातील विप्रो कंपनीतील कामगारांचा गेल्या चौदा महिन्यापूर्वी कामगारांचा वेतनवाढीचा करार संपला आहे. त्यामुळे नवीन वेतनवाढीचा करार महाराष्ट्र कामगार विकास संघटनेच्या वतीने कंपनी व्यवस्थापनाला दिला आहे. मात्र, कंपनी व्यवस्थापन या करारा संदर्भात कुठलीही बैठक घेत नाही. त्यामुळे कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहे.

त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने संघटनेचे पदाधिकारी व कंपनीच्या युनिट पदाधिकाऱ्यांशी लवकरात लवकर सकारात्मक चर्चा करून कामगारांना पगार वाढ द्यावी यासाठी व्यवस्थापनाशी सतत संपर्क साधत मागणी केली. मात्र, व्यवस्थापन कामगारांच्या पगार वाढीकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रवेशद्वारासमोर कामगार आमरण उपोषणाला बसले आहे. तसेच आता उपोषणाला बसून तीन दिवस उलटून देखील कंपनीचे व्यवस्थापक कामगारांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment