Thursday, October 6, 2022

Buy now

वीस हजार रुपयाची लाच घेताना वायरमन एसीबीच्या जाळ्यात

औरंगाबाद – नवीन वीज कनेक्शन देण्यासाठी 20 हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारताना बजाजनगर येथील विद्युत वितरण कार्यालयाच्या वायरमनला जेरबंद करण्यात आले. ही कारवाई काल साजापूर येथे करण्यात आली.

बजाजनगर येथील विद्युत वितरण कार्यालय, के सेक्टर युनिट 2 च्या कार्यालयातील वायरमन सचिन कडूबा पाडळे याने साजापूर येथे नवीन विद्युत मीटर कनेक्शन देण्यासाठी फिर्यादीकडे 20 हजार रुपयाची मागणी केली. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे बुधवारी रोजी तक्रार केली. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रोजी साजापूर येथे सापळा रचला. यावेळी फिर्यादीच्या घरासमोर आरोपी सचिन कडूबा पाडळे याने 20 हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याच वेळी त्यास जेरबंद करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस उपअधीक्षक रूपचंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रेश्मा सौदागर यांनी केली.