पॉझिटिव्ह रूग्ण एक हजारांपर्यंत गेल्याने शहरात २१ कोवीड केअर सेंटर सुरू करणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | शहरात दररोज एक हजार पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत असल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांवर कुठे उपचार करावेत, असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला असून, युध्दपातळीवर २१ कोवीड केअर सेंटर सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यातील ९ केंद्रे सुरूही झाली आहेत. आजा सुरू केलेले केंद्र दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हाउसफुल्ल होत आहे. दररोज एक नवीन केंद्र उघडण्याची लगबग महापालिकेला करावी लागत आहे.

१ मार्चपासून महापालिकेने मोठ्या प्रमाणात तपासण्या सुरू केल्या. दररोज चार ते पाच हजार तपासण्या करण्यात येत आहेत. महापालिकेच्या काही तपासणी केंद्रांवर नागरिकांनी लांबलचक रांगाही लावलेल्या आहेत. किरकोळ ताप असला तरी नागरिक तपासणीसाठी धाव घेत आहेत. १00 नागरिकांची तपासणी केली तर किमान २५ ते ३0 पॉझिटिव्ह येत आहेत. आर्थिक परिस्थिती उत्तम असलेले नागरिक थेट खासगी रूग्णालयात दाखल होत आहेत. काही नागरिक महापालिकेच्या कोवीड केअर सेंटरवर अवलंबून आहेत. महापालिका त्यांना जेवण आणि मोफत उपचारही देत आहे.
कोरोनाचा संसर्ग थांबावा म्हणून विकेंडला दोन दिवस लॉकडाउन करण्यात येत आहे. प्रशासनाकडून कडक निर्बंधही लागू करण्यात आले आहे. यानंतरही कोरोनाची साखळी ब्रेक व्हायला तयार नाही. एकाच कुटुंबातील किमान तीन ते चार नागरिक पॉझिटिव्ह रूग्ण येत असल्याने चिंता अधिकच वाढत आहे.

दररोज पॉझिटिव्ह येणाऱ्या नागरिकांपैकी ६0 टक्के नागरिक महापालिकेच्या सीसीसीमध्ये दाखल होत आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा तोकडी पडत असल्याने युध्दपातळीवर कंत्राटी कर्मचारी भरती महापालिकेने सुरू केली आहे. शहरात कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे महापालिकेला दररोज एक नवीन उपचार केंद्र सुरू करावे लागत आहे. नवीन उपचार केंद्रांसाठी लागणाºया गाद्या आणि इतर साहित्य देण्याचे काम महापालिकेकडून अविरतपणे सुरू आहे.

शासकीय कार्यालयांमध्ये २१ पॉझिटिव्ह आढळले
शहरातील पाच प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये २१ जण पॉझिटिव्ह आढळून आले. मनपा मुख्यालयात दिवसभरात १५ नागरिकांची अ‍ॅन्टिजन चाचणी केली, त्यामध्ये तब्बल ८ जण पॉझिटिव्ह आढळून आले. पोलीस आयुक्त कार्यालयात २0 पैकी ७, विभागीय आयुक्त कार्यालयात ६८ पैकी ६ नागरिक पॉझिटिव्ह आढळले. जिल्हाधिकारी कार्यालयात ५0, आरटीओ कार्यालयात ५४ जणांची तपासणी करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment