व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक ! लग्नानंतर एक महिन्यातच सासरच्यांच्या अमानुष छळामुळे विवाहितेचा मृत्यू

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये लग्नाला एक महिना होण्याअगोदरच सासरच्यांनी एका तरुणीचा मानसिक आणि शारीरिक छळ करायला सुरुवात केली. सासरच्यांनी केलेला छळ असह्य झाल्याने विवाहितेचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी विवाहितेच्या कुटुंबीयांनी नवऱ्यासह सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडितेची प्रकृती खालावली असतानासुद्धा आरोपींनी तिच्याकडे दुर्लक्ष केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

‘तुला स्वयंपाक येत नाही, तू आमच्या लायकीची नाहीस, तू आम्हाला आवडत नाही, तुझ्या घरच्यांनी हुंडा दिला नाही, मानपान केला नाही. तू माहेराहून फर्निचरसाठी पाच लाख रुपये घेऊन ये, पैसे आणले नाहीत तर तुला नांदवणार नाही,’ असे म्हणत सासरच्यांनी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. मागच्या १ वर्षांपासून हा छळ सुरु आहे. हा छळ असह्य झाल्याने पीडितेची प्रकृती खालावत गेली आणि यामध्येच तिचा मृत्यू झाला.

मृत झालेल्या महिलेचे नाव शुभांगी होनाजी ढिकले असे आहे. याप्रकरणी मृत महिलेचे वडील होनाजी रामदास ढिकले यांनी फिर्याद दिली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये मुलगी शुभांगीचा विवाह दिंडोरी तालुक्यातील हस्तेदुमाला येथील जयेश संजय बस्ते यांच्याशी झाला होता. विवाहाच्या एक महिन्यातच पती जयेश, सासरे संजय जगन्नाथ बस्ते, सासू सरला बस्ते, नणंद कस्तुरी अतुल पाटील यांनी विवाहितेला त्रास द्यायला सुरुवात केली होती असे होनाजी रामदास ढिकले यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. तसेच घरात फर्निचर करण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये घेऊन, यासाठी शुभांगीचा छळ करण्यात आला होता. आरोपींच्या छळामुळे पीडित शुभांगीची प्रकृती खालावली. पण सासरच्यांनी जाणूनबुजून पीडितेच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले. यानंतर आजारी अवस्थेतच शुभांगीला माहेरी पाठवण्यात आले. यामुळे शुभांगीचा मृत्यू झाल्याचा दावा फिर्यादीने आपल्या तक्रारीत केला आहे. वणी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.