नवी दिल्ली । फार्मास्युटिकल कंपनी वोकहार्टने शुक्रवारी सांगितले की,”दुबईस्थित एनसो हेल्थकेअर आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) च्या सहाय्यक कंपनीने कोविड 19 लस स्पुतनिकचे उत्पादन आणि पुरवठ्यासाठी करार केला आहे.”
वोकहार्टने एका नियामक सूचनेत म्हटले आहे की,”त्यांनी स्पुतनिक व्ही, स्पुतनिक लाइट लसीचे उत्पादन आणि पुरवठ्यासाठी RDIF च्या व्यवस्थापन कंपनीची संपूर्ण मालकीची संस्था एन्सो आणि ह्यूमन व्हॅक्सिन LLC सोबत करार केला आहे.”
ह्यूमन व्हॅक्सिन LLC कडून यशस्वी तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी आवश्यक मान्यता आणि इतर अटींच्या अधीन राहून, कंपनी एन्सोसाठी स्पुतनिक व्ही आणि स्पुतनिक लाइट लसींचे 6.2 कोटी डोस तयार आणि पुरवठा करेल. वोकहार्ट म्हणाले, “स्पुतनिक व्ही आणि स्पुटनिक लाइटच्या 6.2 कोटी डोसच्या उत्पादनासाठी कराराचा कालावधी जून 2023 पर्यंत आहे.”