कामगार दिन आर्थिक शोषण दिन म्हणून करू साजरा. कामगार शक्ती संघटनेकडून इशारा.

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महानगर पालिकेचे ‘ फ्रंट लाईन वर्कर ‘ हे औरंगाबाद शहरासाठी महत्वाची कामगीरी बजावत आहे तरीही त्यांना त्याचे वेतन वेळेवर मिळत नाही या विरोधात कामगार शक्ती संघटनेचे अध्यक्ष गौतम खरात यांनी औरंगाबाद मनपा विरोधात येत्या १ मे रोजी म्हणजेच कामगार दिनाच्या दिवशी कामगार आर्थिक शोंशन दिन म्हणून मनपा विरोधात आंदोलन करू असे हॅलो महाराष्ट्र सोबत बोलताना सांगितले.

ते म्हणाले
मनपा वेळच्यावेळी पगार देत नसून कामगारांच्या आर्थिक अडचणी वाढत आहे. मासिक वेतन हे दोन दोन महिने वेतन थांबवले जात आहे. यामुळे कामगारांनी कोरोनाच्या पार्शवभूमीवर आर्थिक समस्यांना कसे सामोरे जाणार हा महत्वाचा प्रश्न आहे हे आंदोलन मनपा विरोधात असून आम्ही कामगार दिन नाही तर कामगार आर्थिक शोषण दिन म्हणून साजरा करू तसेच पालकमंत्री अनिल देशमुख यांनाही आम्ही निवेदन देऊन या प्रकाराबद्दल त्याच्याशी चर्चा सुद्धा करणार आहे

कामगारांच्या होत असलेल्या आर्थिक अडचणी आणि कामगाराच्या आरोग्याच्या प्रश्नावर या आधी सुद्धा अनेक आंदोलने औरंगाबाद महानगर पालिकेच्या विरोधात झाले. आता हे आंदोलन कितीपट कामगारांच्या फायद्याचे ठरते येत्या काळात आपल्याला पाहायला मिळेल.

Leave a Comment