जागतिक कर्करोग दिन२०२०: स्तन कर्करोगाच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। ४ फेब्रुवारी हा दिवस जगभरात जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जात आहे. यावेळी, जागतिक कर्करोग दिन २०२० थीम ”आई एम एंड आई विल” ठेवली आहे. जागतिक स्तरावर कर्करोगाशी महिलाच सर्वात जास्त महिलाच लढतांना दिसतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार, दरवर्षी तब्बल २१ लाख महिला स्तनाच्या कर्करोगाला बळी पडतात. भारताच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास डब्ल्यूएचओच्या मते, प्रत्येक २८ व्या महिलेला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात स्तनाचा कर्करोग आहे. डब्ल्यूएचओच्या माहितीनुसार,भारतातील कर्करोगाबाबत महिलांना जागरूक करणे फार महत्वाचे आहे.

स्तन कर्करोगाचे १२ प्रकार आहेत
डब्ल्यूएचओच्या मते, केवळ स्तनाचा कर्करोग १२ प्रकारचा असतो. दुर्दैवाने, बहुतेक महिला याबद्दल जागरूकता नसतात. म्हणूनच, जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने आम्ही स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती असू शकतात आणि हा शरीरभर कसा पसरतो याबाबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. तसेच स्तन कर्करोगाचे कोणते उपाय आहेत. डॉक्टरांच्या मते, स्तनाच्या कर्करोगात कर्करोगाच्या पेशी स्तनाच्या ऊतींमध्ये तयार होतात. स्तनानंतर, या ऊती शरीरभर पसरतात. काही प्रकरणांमध्ये, स्तनाचा कर्करोग हवेच्या प्रदूषणामुळे होऊ शकतो.

स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे ओळखा

१)चेहऱ्याची जळजळ आणि त्वचेची सुजणे, लालसर होणे

२) स्तनाच्या आकारात बदल

३) स्तनाग्र आणि स्तनामध्ये वेदना किंवा सूज

४)स्तनाग्र रक्तस्त्राव

५)बगलातील ढेकूळ पाहून

६) स्तन आणि आसपासच्या भागात खाज सुटणे किंवा सतत सूज येणे

७) स्तन दाबण्यावर तीव्र वेदना

जर यापैकी कोणतीही लक्षणे आढळून आल्यास ताबडतोब आपल्या डॉक्टरांशी किंवा जवळच्या रुग्णालयात संपर्क साधा.

स्तनाचा कर्करोग कशामुळे होतो?

१) एका वयापर्यंत गर्भधारणा न करणे

२) म्हातारपणी गर्भवती होणे

३) बाळाला स्तनपान न करणे

४) अचानक वजनात वेगाने होणे

५) अनियंत्रित जीवनशैली

६) जास्त प्रमाणात मद्यपान

स्तनाच्या कर्करोगाचा प्रतिबंध कसा करावा

१) जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, स्तन कर्करोगाचा सर्वात महत्वाचा प्रतिबंध म्हणजे नियंत्रित आहार.

२) स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी निरोगी हलका आहार घेणे सर्वात महत्वाचे आहे

३) कर्करोगाची कोणतीही लक्षणे दिसल्यास मद्यपान बंद करा.

स्तनाच्या कर्करोगावर मात करण्यासाठी शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिओथेरपी किंवा हार्मोन थेरेपी.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

Leave a Comment