पुण्याच्या दोन महिलांनी बसस्थानक परिसरातून एकीचे केले अपहरण; कारण ऐकाल तर..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | पैशाच्या व्यवहारातून एका महिलेचे अपहरण करण्यात आल्याची खळबळजनक घटना साताऱ्यातील बसस्थानक परिसरात शनिवारी दि. 25 रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात घबराटीचे वातावरण होते. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात पुण्यातील दोन महिलांवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणात चैताली अशोक मते (रा. सिंहगडरोड, पुणे), योगिता पवार (रा. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोन महिलांची नावे आहेत. पुजा गणेश आवडे (वय- 28, रा. विकासनगर, सातारा) यांची आई संगिता अरुण कंठे (रा. विकासनगर, सातारा) यांनी चैताली मते हिच्याकडून पैसे घेतले होते.

उसने घेतलेले पैसे न दिल्याने चैताली मते आणि योगिता पवार या दोघींनी कंठे यांना जबरदस्तीने गाडीमध्ये बसवून पळवून नेले. या प्रकारानंतर पुजा आवडे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी संबंधित महिलांच्या शोधासाठी पुण्याला पथके रवाना केली असल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली.

Leave a Comment