धक्कादायक ! पळून गेलेल्या दीर आणि वहिनीची आत्महत्या

करनाल : वृत्तसंस्था – हरियाणातील करनाल परिसरात राहणाऱ्या परमजीत नावाच्या महिलेचं 12 वर्षांपूर्वी मनोजसोबत लग्न झालं होतं. त्यांना 3 मुलंदेखील आहेत. काही महिन्यांपूर्वी परमजीत आणि मनोजचा धाकटा भाऊ अमन यांच्यात प्रेमसंबंध निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. यानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांनी घरातून पळून जाऊन एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. हे दोघे पळून गेल्यानंतर घरात एकच खळबळ उडाली. यांनतर घरात एकच खळबळ उडाली.

यानंतर पोलिसांनी तिला 15 दिवसात शोधून काढून घरी आणलं होतं. त्यानंतर परमजीत आपल्या मुलांसोबत राहत होती, तर अमनला घरातून हाकलून देण्यात आलं होतं.आपले प्रेमप्रकरण फसल्यामुळे समाजात होणारी बदनामी सहन न झाल्यामुळे परमजीत आणि अमन या दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. यानंतर हे दोघे रेल्वे ट्रॅकवर गेले आणि रेल्वेखाली उडी घेऊन आपला जीव दिला.

आत्महत्या करण्यापूर्वी हे दोघे काही दिवस अगोदर घरातून गायब झाले होते. घटनेच्या दिवशी रेल्वे ट्रॅकवर एका पुरुषाचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. तसेच या बरोबर एका महिलेचासुद्धा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हे मृतदेह परमजीत आणि अमन यांचे असल्याची खात्री केली. यानंतर या दोघांचे मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. या दोघांनी नेमकी कशामुळे आत्महत्या केली हे अजून समजू शकले नाही.

You might also like