कामथी येथे किरकोळ कारणावरून महिलेस मारहाण, दोघांवर गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कामथी ता. कराड येथे किरकोळ कारणावरून महिलेस दोघांनी मारहाण केली. शनिवारी 15 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद संगिता आनंदा पवार (वय 40) रा. कामथी ता. कराड यांनी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली असून याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पूनम विनोद सूर्यवंशी व विनोद मारूती सूर्यवंशी रा. कामथी ता. कराड असे याप्रकरणी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कामथी ता. कराड गावच्या हद्दीत विनोद सूर्यवंशी याच्या घरासमोरील रस्त्यावरून फिर्यादी संगिता व तिचे पती आनंदा पवार गाडीवरून रानात निघाले होते. याच वाटेवर पूनम सूर्यवंशी भांडी घासत बसल्या होत्या. यावेळी भांडी बाजूला घे आम्हाला जावू देत, असे म्हणाल्याच्या कारणावरून पूनम सूर्यवंशी हिने संगिता पवार हिला शिवीगाळ केली. तसेच विनोद सूर्यवंशी याने चिडून शिवीगाळ करत बाजूला पडलेल्या दगड संगिता पवार यांच्या डोक्यात घालून जखमी केले.

याबाबत संगिता पवार यांनी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार लावंड करीत आहेत.

Leave a Comment