औरंगाबाद : शहरात दिवसेंदिवस हत्येचे सत्र सुरूच आहे. शहरभरात सगळीकडे पोलिसांची नाकाबंदी असताना त्याबरोबरच बंदोबस्त असताना अनेक खुनाचे प्रकार समोर येत आहेत.आठवडाभरापूर्वीच बजाजनगर भागात गॅंगवॉर मधून एकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती.आज पुन्हा एकदा एका अनोळख्या महिलेचा मृतदेह बजाज नगर भागात आढळला आहे.
याबद्दल सविस्तर वृत्त असे की, बजाज नगर भागातील एस.टी. कॉलनीमध्ये हात-पाय बांधलेल्या अवस्थेत एका अनोळख्या महिलेचा मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळला आहे. रहिवाशी भागात हा मृतदेह आढळल्याने लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
एम.आय डी. सी. वाळूज पोलीस घटनस्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी मृत महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे.