… तेव्हा एलियन्सने मला उचलून नेलं, अन…; महिलेच्या अजब दाव्याने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आज-काल मानवाने खूप प्रगती केलेली आहे. माणूस अगदी चंद्रावर देखील पोहोचला आहे. आणि मंगळावर जाण्याची देखील तयारी करत आहे. पृथ्वीवरील लोकांनी अनेक गोष्टींचा शोध लावला असला, तरी अशा काही गोष्टी आहेत. ज्या शास्त्रज्ञ वर्षांनुवर्ष झाले शोधत आहेत. परंतु तरीही त्या रहस्याचा शोध लागलेला नाही. असे मानले जाते की, जगात कुठेतरी एलियन राहतात. परंतु ते कुठे राहतात हे माहित नाही. कधी कधी हे एलियन पृथ्वीवर देखील दिसतात. असे देखील म्हटले जाते. आता एका महिलेने या एलियन्सबाबत एक धक्कादायक दावा केलेला आहे.

या महिलेचे नाव शेरी वाईल्ड असे आहे. ही एक लेखिका आहे. आणि तिने केलेल्या दाव्यानुसार वीस वर्षांपूर्वी तिला एलियन्सने उचलून नेले होते. परंतु त्यावेळी तिला या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. तिला या घटनेबद्दल काही आठवत देखील नव्हते. दोन तास ती पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत होती. परंतु तिला त्यानंतर जेव्हा जाग आली तेव्हा तिला काहीच आठवले नव्हते.

एलियन्सने दोन तासांचे अपहरण केले
तिने 2015 मध्ये या एलियनबद्दल हा दावा केला होता. जो नुकताच यूट्यूब चैनल सोशल मीडियावर पुन्हा एकदा समोर आलेला आहे. तिने सांगितलेले की, एके दिवशी तिची कार रस्त्याच्या मधोमध बंद पडली. दोन तास तिच्यासोबत काय झाले हे तिला काहीच आठवत नव्हते. त्या दोन तासात तिच्यासोबत काय झाले. याचा शोध ती गेले वर्षानुवर्षे घेत होती. त्यानंतर तिने एका तज्ञांची मदत घेतली. त्यानंतर तिला समजले की, त्या दोन तासात एलियन्सने तिला उचलले होते आणि त्यांच्या जहाजेवर नेले होते.

शेरनी सांगितले की, एक दिवस अचानक एलियन्स तिच्या कार जवळ पोहोचले. आणि तिला कारमधून उतरण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या स्पेसमध्ये तिला घेऊन गेली. ती स्पेस शिफ्ट सुमारे वीस फूट लांब होती. आणि खूप थंड होती. आज पूर्ण अंधार होता. तिने सांगितलेल्या माहितीनुसार एलियन्सने तिला एका स्लॅप टेबलवर झोपायला सांगितले. आणि तिची अंडी बाहेर काढली जेथून तिला उचलले होते. परंतु तिथून निघताना त्याबद्दलची सगळी आठवण पुसून काढली होती. जेणेकरून तिला या घटनेबद्दल पुढे जाऊन काहीच आठवले नाही.