व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मृत्यूपूर्वीची सेल्फी ठरली अखेरची ! 8 महिन्यांच्या बाळासमोर विवाहितेची आत्महत्या

जयपूर : वृत्तसंस्था – जयपूरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये आदल्या दिवशी पती आणि बाळासोबत सेल्फी घेऊन दुसऱ्या दिवशी विवाहितेनं आत्महत्या केली आहे. पती कामानिमित्त बाहेर असताना आपल्या 8 महिन्यांच्या बाळासमोर विवाहितेनं आत्महत्या केली. पतीच्या आवडीच्या साडीची किनार कापून तिने त्याच्या सहाय्य्यने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

राजस्थानमधील माधवगंजमध्ये राहणाऱ्या सत्येंद्र कुशवाह यांचं अडीच वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांना 8 महिन्यांची एक मुलगीही होती. आत्महत्येच्या एक दिवस अगोदर सत्येंद्र आणि बाळासह तिने सेल्फीदेखील घेतला होता. आदल्या दिवसापर्यंत ती एकदम खूश होती, असं सत्येंद्र याचं म्हणणं आहे. मात्र त्या रात्री घेतलेला तो सेल्फी तिच्या आयुष्यातील अखेरचा सेल्फी ठरला आहे. मंगळवारी सत्येंद्र कामानिमित्त बाहेर गेले असताना या महिलेने साडीच्या सहाय्य्यने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या महिलेचे बाळ बराच वेळ रडत असल्याने शेजाऱ्यांनी चौकशी करण्यासाठी दरवाजा ठोठावला, तेव्हा आतून काहीच प्रतिसाद आला नाही.

यानंतर शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती सत्येंद्र यांना आणि पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा त्यांना या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या महिलेने आत्महत्येपूर्वी कुठलीही चिठ्ठी लिहिली नसल्यामुळे तिने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अजून समजू शकले नाही.