सुंदर दिसणे बेतले महिलेच्या जीवाशी; या कारणामुळे झाला मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपण अत्यंत सुंदर आणि नेहमीच तरुण दिसावं. असं प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. यासाठी आपले जीवनशैली चांगली ठेवणे गरजेचे आहे. तुम्ही चांगला आहार घेतला पाहिजे. तसेच व्यायामाकडे लक्ष दिले पाहिजे. पुरेशी झोप घेतली पाहिजे. तसेच भरपूर पाणी देखील पिले पाहिजे. त्यामुळे तुमची त्वचा देखील तरुण राहते. आणि नेहमीच तुम्ही टवटवीत दिसता. परंतु अनेक महिलांना पटकन इफेक्ट हवा असतो. त्यामुळे अनेक महिला ह्या कॉस्मेटिक सर्जरीचा पर्याय निवडतात. या सर्जरी अत्यंत महाग देखील असतात. परंतु त्या यशस्वी होतीलच याची काही हमी नसते. आणि असाच एक विचित्र प्रकार एका महिलेसोबत घडलेला आहे. तरुण दिसण्याच्या नादात त्या महिलेला आपला जीव गमवावा लागलेला आहे.

एका महिलेच्या या कॉस्मेटिक सर्जरीमुळे जीव गेलेला आहे. ही घटना दक्षिण चीनमधील आहे. येथे राहणाऱ्या एका महिलेने सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी एका दिवसात सहा कॉस्मेटिक सर्जरी केल्या. आणि या सर्जरी केल्यानंतर तिला तिचा जीव गमवावा लागलेला आहे.

चीनमध्ये एका ग्रामीण भागात राहणारी ही महिला होती. तिने सुंदर दिसण्यासाठी केलेले आहे. महिलांनी येथील एका ब्युटी क्लिनिंगमध्ये गेली तिथे 24 तासात सहा कॉस्मेटिक सर्जरी करून दिल्या. 9 डिसेंबर 2020 ला त्या महिलेने डबल हाईट लीड सर्जरी केली. त्यानंतर तिला तिचं नाक नीट करून दिलं. या सरकारी साठी जवळपास पाच तास लागलेले आहे. त्यानंतर तिने तिच्या मांड्यांवरील फॅट्स काढण्यासाठी लीपोसक्शन प्रोसिजर करून घेतली. त्यानंतर काही तासानंतर तिने तिच्या चेहऱ्यावरील आणि स्तनांवरील फॅक्ट इंजेक्ट प्रोसिजर केली. या सर्जरीसाठी जवळपास पाच तास लागले.

त्यानंतर 11 डिसेंबर रोजी त्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. परंतु त्यानंतर ती अचानक बेशुद्ध झाली आणि तिला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तिथे गेल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आले. रिपोर्टनुसार महिलेचे अवयव निकामी झाल्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे. लिपोसक्शन सर्जरी मुळे तिचे अवयव निकामी झाले असे घोषित करण्यात आलेले आहे. ही महिला दोन मुलांची आई होती. तिच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूनंतर नुकसान भरपाई देखील मागितली होती. परंतु रुग्णालयाने त्यांना फार कमी ऑफर दिली. आणि नंतर हे प्रकरण कोर्टात देखील केली दिले. त्यानंतर कोर्टाने रुग्णालयाला त्या कुटुंबाला जवळपास दीड कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यासाठी सांगितले.