हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आई बनणं हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असत. आई हि एकमेव व्यक्ती असते कि, जी आपल्या मुलाचे लाड, कौतुक तर करतेच आणि अनेक चुकांना पांघरून घालण्याचं कामही तीच करते. मुलाला जन्म देणं हे जस कष्टमय गोष्ट आहे आणि त्यातूनहि आपला बाळ जगणार नाही हि गोष्ट सहन करणे जास्त अवघड आहे.
अशीच एक घटना न्यू जर्सी येथे घडली. प्रवास करण्यासाठी आलेली एक गर्भवती महिला रेल्वे स्टेशन मध्ये असलेल्या वॉश रूम साठी गेली असता . तिथेच तिने मुलीला जन्म दिला . हि अचानक घडलेल्या गोष्टीमुळे ती घाबरलेल्या अवस्थेत बाहेर आली. परंतु मुलीची कोणत्याच प्रकारची हालचाल नसल्याने ती मृत आहे असे गृहीत धरले गेले. तिने त्या मुलीला मृतावस्थेत जन्म दिला होता. हि घटना बाहेर उभ्या असलेल्या दोन ऑफिसर्स ने पहिली आणि तुरंत तिच्या मदतीला धावून आले.
ऑफिसर्स ब्रायन रिचर्ड आणि ऑफिसर अल्बट्रो नून्स यांनी घटना पाहताच तिकडे धाव घेतली. त्या मुलीला आपल्या कुशीत घेत तिला खूप वेळ ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला. खूप वेळानंतर तिचा श्वसोच्छ्वास सुरु झाला आणि तिचा पुनर्जन्म झाला. त्यानंतर त्या मुलीला हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आले. आता त्या मुलीची तब्बेत ठीक आहे.
रेल्वे स्टेशन मध्ये असलेल्या कॅमेरा मध्ये हि सर्व घटना कैद झाली आहे. सर्व स्तरातून या दोन्ही ऑफिसर्स चे कौतुक होत आहे. ऑफिसर्स ने सांगितले कि , ‘महिला जेव्हा वॉश रूम मध्ये गेली तेव्हा तिला हि अंदाज आला नसेल कि आपण मुलीला इथे जन्म देणार आहोत. अचानक
घडलेल्या या घटनेमुळे ती महिला प्रचंड घाबरलेली होती आणि त्यातच तीने मृत मुलीला जन्म दिला असं कळलं तेव्हा मात्र तिने रडण्यास सुरुवात केली. अश्या वेळी आम्ही त्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला. ती मुलगी जेव्हा पहिल्यांदा रडली तेव्हा ,मात्र खूप आनंद झाला’. त्या मुलीच्या आईने सुद्धा ऑफिसर्स चे आभार मानले. ती म्हणाली कि , आज जर हे ऑफिसर्स नसते तर माझ्या मुलीला मला जिवंत पाहता आले नसते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.