वडिलांच्या ‘त्या’ कृत्याला वैतागून मायलेकांनी मिळून वडिलांनाच संपवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पत्नीनेच आपल्या पतीची हत्या केली आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा या ठिकाणी हि धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे आरोपी पत्नीने आपल्या दोन मुलांसोबत मिळून आपल्या पतीची हत्या केली आहे. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या तिघांनी हि हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली याचा तपास पोलीस करत आहेत.

काय आहे नेमके प्रकरण ?
भास्करनगरात संजय खेडकर हे वास्तव्यास होते. या ठिकाणी ते आपली दोन मुले आणि पत्नीसोबत राहत होते. संजय खेडकर यांना प्रतीक व रोहित ही दोन मुले आहेत. मृत संजय खेडकर हे काहीही कामधंदा करीत नव्हते तसेच ते सतत आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असत. या कारणावरून घरात सतत वाद होत होते. आपल्या दोन्ही मुलांनादेखील ते लहान-सहान गोष्टीवरून बोलत असत. तसेच त्यांना अपमानास्पद वागणूकसुद्धा देत होते. यामुळे वडिलांच्या विरोधात आई आणि मुलांच्या मनात राग होता.

यावरून घटनेच्या दिवशी खेडकर कुटुंबीयांत जोरदार वाद झाला. हा वाद मोठ्या प्रमाणात वाढला. यानंतर आरोपी पत्नीने आपल्या दोन मुलांच्या साहाय्याने संजय खेडकर यांच्या डोक्यावर आणि शरीरावर हत्याराने वार केले. यामध्येच संजय खेडकर यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली. यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपी मायलेकांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पाचोरा पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment