Thursday, October 6, 2022

Buy now

महिला दिनीच पत्नीची हत्या; तब्बल दोन तास मृतदेहाशेजारी बसला आणि मग…

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – महिला दिनीच पतीने आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हि धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील एका चौकामध्ये घडली आहे. या घटनेत पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार वार करून हत्या केल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

करवीर तालुक्यातील पाचगाव या ठिकाणी महिला दिना दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत महिलेचे नाव अरुणा पवार असे आहे तर आरोपी पतीचे नाव विजय पवार असे आहे. आरोपी विजय पत्नीची हत्या केल्यानंतर दोन तास तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृत्यूदेहसोबत बसून होता. त्यानंतर त्याने आपण आपल्या पत्नीची हत्या केली असल्याचे सांगितले.

यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपी पतीला अटक करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, हे दाम्पत्य कर्नाटकातील असल्याचे समजत आहे. ते कोल्हापुरातील पाचगाव येथे एका भाड्याच्या खोलीत राहत होते. आरोपी विजय पोवार हा एक कामगार आहे. मागच्या काही दिवसांपासून पती आणि पत्नी यांच्यात वाद सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेच्या दिवशी त्यांच्यात मोठ्या प्रमाणात वाद झाला. याच वादातून आरोपी पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे.