जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये एका कथित पत्रकराने महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करून तिचा विनयभंग केला आहे. तसेच या कथित पत्रकाराने त्या महिलेला धमकीसुद्धा दिली. या प्रकरणाची माहिती त्या परिसरातील नागरिकांना समजताच त्यांनी या आरोपी कथित पत्रकराला बेदम मारहाण केली. या मारहाणी प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण ?
पीडित महिला पोलीस नेरी नाका येथे वाहतूक नियंत्रण करण्यासाठी ड्युटीवर होत्या. यावेळी आरोपी सलीमखान आरमानखान पठाण हा पीडित महिला कर्मचाऱ्याकडे आला. तेव्हा त्याने मनीषा मॅडमचा मोबाईल नंबर द्या असे सांगितले. त्यावेळी आपल्याकडे मनीषा मॅडमचा मोबाईल नंबर नसल्याचे पीडित महिलेने सांगितले. याचा राग आल्याने सलीमखान हा महिला पोलीसाच्या अंगावर धावून आला. आणि ‘मी रिपोर्टर आहे, मी तुझी नोकरी घालवतो, तुझा साहेब मला सलाम करेल’ अशी धमकी त्या पीडित महिलेला दिली.
कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचारीचा हात पकडून तसेच तिचा मोबाइलमध्ये फोटो काढल्यावरुन गोंधळ निर्माण झाला. यानंतर या पीडित पोलीस कर्मचारी महिलेने शनीपेठ पोलीस ठाण्यात फोनकरून पोलीस कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. त्यानंतर त्याला पोलिसानी ताब्यात घेतले. मात्र त्याअगोदर या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही नागरीकांनी या आरोपीला बेदम चोप दिला. यानंतर शनीपेठ पोलिसांनी संशयित आरोपी सलीम खान आरमानखान पठाण याच्याविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.