विवाहित महिलेने सासरी केली आत्महत्या, त्यानंतर माहेरच्या लोकांनी संतप्त होऊन उचलले ‘हे’ पाऊल

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यतील मिरज तालुक्यातील एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे विवाहितेच्या माहेरची मंडळी मोठ्या प्रमाणात संतप्त झाली आहेत. त्यानंतर माहेरच्या लोकांनी पतीच्या घरासमोरच विवाहितेवर अंत्यसंस्कार केले आहेत.

काय आहे नेमके प्रकरण ?
आरती अभिनंदन तळदंगे असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित महिलेचे नाव आहे. या महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना मिरज तालुक्यातील लक्ष्मीवाडी या ठिकाणी घडली आहे. या मृत महिलेचे माहेर कर्नाटकातील अथणी तालुक्यातील केंपवाड या ठिकाणी आहे. 10 वर्षांपूर्वी या मृत महिलेचे लग्न अभिनंदन याच्याशी झाले होते.

काय घडले नेमके ?
पैशाच्या मागणीसाठी पती व सासऱ्यांनी मृत महिलेचा छळ केला. त्यामुळे तिला आत्मत्या करावी लागली, असा आरोप महिलेच्या माहेरच्यांकडून करण्यात आली आहे. यानंतर या महिलेच्या माहेरच्यांनी या महिलेचा पती अभिनंदन याच्या घरासमोरच तिच्यावर अंत्यसंस्कार केले. या घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.