आता तर हद्दच झाली ! पुराच्या पाण्यात बुडाली तरी सेल्फी काढायचे सोडले नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काही लोकांना सेल्फी (selfie) घेण्याची इतकी हौस असते की ते कधीही, कुठेही सेल्फी (selfie) घेताना दिसतात. फिरायला गेल्यावर एखादं सुंदर दृश्य दिसलं तर मग सेल्फी (selfie) घेण्याचा मोह साहजिकच कुणालाही आवरणार नाही. पण एका महिलेने तर हद्दच पार केली. तिने तर पुरातही सेल्फी घेणं सोडलं नाही. ती पुराच्या पाण्यात बुडाली पण तरीदेखील ती पाण्यातून हात बाहेर काढून आपला व्हिडीओ (selfie) शूट करत राहिली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हिडिओमध्ये एक महिला हातात सेल्फी स्टिक घेऊन आपला व्हिडीओ शूट करते आहे. ती पळताना दिसते. तिच्या मागून आणखी काही लोक पळत आहेत. महिला पुढे येऊन उभी राहते आणि मागून समुद्राच्या लाटेसारखं पाणी येताना दिसतं. हे पुराचं पाणी आहे. महिला त्या पुरात पूर्णपणे बुडते. पण ती आपला हात पाण्याच्या आत जाऊ देत नाही. ज्या हाताता सेल्फी (selfie) स्टिक आहे तो एक हात ती पाण्याबाहेरच ठेवते आणि व्हिडीओ शूट करत राहते.

या महिलेला आपला पुराच्या पाण्यात जीव जाईल या भीतीपेक्षा सोशल मीडियावर आपल्या व्हिडीओकडे जास्तीत जास्त लोकांचं लक्ष वेधून घेण्याचीच घाई आहे. या महिलेला आपल्या जिवापेक्षा सेल्फी (selfie) महत्वाचा आहे हे या व्हिडिओमधून दिसत आहे. या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इंडोनेशियातील असल्याचे बोलले जात आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर

Leave a Comment