वाळूचा ट्रक अडवल्याने महिला तलाठीला मारहाण; भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल ( Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नंदुरबार : हॅलो महाराष्ट्र – भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांनी एका वाळू तपासणी पथकातील महिला तलाठीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना नंदुरबारमध्ये घडली आहे. आरोपी नगरसेवक गौरव चौधरी याने महिला तलाठी निशा पावरा यांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे. या प्रकरणी महिला तलाठी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

https://www.facebook.com/100057314121283/videos/256160679637734/

काय आहे नेमके प्रकरण
भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांच्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाकडे गुजरातहून महाराष्ट्रात वाळू वाहतूक करण्यासंबंधित स्वामीत्व पावती नव्हती. त्यामुळे महिला तलाठीने वाळूचा ट्रक दोन तास अडवून धरला. या दरम्यान ट्रक चालकाने ट्रक पळवून नेण्याचाही प्रयत्न केला. यानंतर महिला तलाठी निशा पावरा यांनी आपल्या अन्य दोन सहकारी महिलांसोबत पाठलाग करून हा ट्रक पकडला.या घटनेची माहिती मिळताच ट्रकचे मालक आणि भाजप नगरसेवक गौरव चौधरी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर गौरव चौधरी यांनी महिला तलाठीला शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या महिला तलाठी आणि अन्य अधिकाऱ्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल केला.

यानंतर पोलिसांनी लवकरात लवकर आरोपी नगरसेवकाला अटक करावी यासाठी महिला तलाठ्यासह अन्य अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडले. तर भाजप नगरसेवक गौरव चौधरीने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.आपण कोणालाही मारहाण न केल्याचे त्याने सांगितले आहे. याउलट महिला तलाठीकडून वाळूच्या गाड्या सोडण्यासाठी लाचखोरी मागितल्याचा आरोप गौरव चौधरी यांच्याकडून करण्यात आला आहे. तसेच महिला तलाठी स्वतः पाय अडकून खाली पडल्याचा दावाही नगरसेवकाकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी वाळू ट्रक चालकानेदेखील नंदुरबार शहर पोलिसांत महिला तलाठी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

Leave a Comment