Saturday, February 4, 2023

पोटच्या दोन मुलांसह मातेने घेतली तिसऱ्या मजल्यावरून उडी..

- Advertisement -

औरंगाबाद | गेले काही दिवसांपासून शहरात आत्महत्येचे प्रकार फारच वाढत आहे. शहरात असच आत्महत्येचा एक खळबळजनक प्रकार घडला आहे. आईने आपल्या दोन्ही पोटच्या मुलांसोबत तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतल्याची घटना काल दुपारी उघडकीस आली.

अनिता सतीश हटकर असे या आत्महत्याच्या प्रयत्नात जखमी झालेल्या विवाहितेचे नाव असून, दोन वर्षाची प्रतीक्षा व एक वर्षीय सोहम असे जखमी झालेल्या मुलींचे नाव आहे.

- Advertisement -

ही घटना सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वाळूज औद्योगिक शेत्रात बजाजनगर परिसरात घडली या घटनेचे मूळ कारण म्हणजे शेजाऱ्यांसोबत भांडण झाल्यानंतर महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले

या घटनेत जखमी झालेल्या महिलेला आणि दोन चिमुकल्यां मुलांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेचा तपास वाळूज एमआयडीसी पोलिस करत आहेत

भांडणाचे मूळ कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून महिलेने हे टोकाचे पाऊल का उचलले यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.