औरंगाबाद | एका तिशीतील अनोळखी महिलेचा मृतदेह वाळूज परिसरातील बजाज गेटकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूच्या सर्व्हिसेस रोडवर बुधवारी सकाळी आढळून आला. मृताच्या अंगावर जखमा व खरचलेले असल्याने अपघात कि घातपात याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत.
वाळूज परिसरातील बजाज गेट पासून वडवळकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या बाजूला असलेल्या सर्विस रोडवर बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास अंदाजे 30 ते 35 वयोगटातील एका अनोळखी महिला बेशुद्धावस्थेत पडलेली पंढरपूर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब रहाटे, नायगाव बकवाल नगर येथील ऋषिकेश तराळे, ओमकार काळे, आशिष डिंडोरे, सुरज देवरे यांना दिसली. याबाबत माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र बांगर, पोलीस कॉस्टेबल मोहन पाटील, 108 रुग्णवाहिकेची डॉक्टर सुमित जाधव यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी डॉक्टरांनी तपासून मृत झाल्याचे घोषित केले.
या मृत महिलेच्या डोक्याजवळ जबर मार लागलेला होता. शिवाय पाठीमागे असलेली दिसून आले. प्रत्यक्षदर्शी या महिलेचा अपघात झाल्याची दिसते. मात्र तिचा मृतदेह मुख्य रस्त्यापासून बऱ्याच अंतरावर असल्याने तो अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संभाजी गोरे, केशव बारगजे, पी.एस. अडसूळ, विष्णू ढाकणे, चंपालाल डेडवाल, वडगाव चे पोलीस पाटील एक प्रकाश मस्के, पाटोदाचे लहू मुचक आदींनी हा मृतदेह घाटीत दाखल केला. त्यांच्या श्वविच्छेदन अहवाल आल्यानंतरच या महिलेच्या मृत्यूचे गुड उकळणार करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.




