हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत जवळपास राज्यातील अडीच कोटी महिलांना लाभ मिळालेला आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्यांना 1500 रुपये देणार असल्याची घोषणा सरकारने केली. आणि त्याप्रमाणे 5 हप्ते देखील महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. अशातच विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता वाढवून त्यांना 2100 रुपये देण्याची माहिती सरकारने दिली होती. आणि आता 2100 रुपयाची अंमलबजावणी 21 एप्रिल पासून करण्याची शक्यता आहे.
महायुती सरकारने 1 जुलैपासूनच दर महिन्याला 1500 रुपये देण्याचे सांगितले. परंतु हा विकास आघाडीचा सत्तेवर आली तर, लाडक्या बहिणींना 3 हजार रुपये देईल असा शब्द दिला होता. परंतु यावेळी महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले. आणि आता महायुती सरकारने 2100 रुपये देण्याचे वचन पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. परंतु हाती आलेल्या माहितीनुसार हे 1500 रुपये लगेचच द्यायला सुरुवात होणार नाही. तर 21 एप्रिल पासून अर्थसंकल्प अधिवेशनातील तरतूद केल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहे.
आता राज्यातील अनेक महिला या लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी येणार याची वाट पाहत आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये हा हप्ता येईल, अशी देखील माहिती दिली होती. परंतु 2100 रुपये महिलांना लगेच मिळणार नसून ते एप्रिल महिन्यापासून चालू होणार आहे. तोपर्यंत महिलांना सुरुवातीला ठरल्याप्रमाणे 150 रुपये दर महिन्याला त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.