सायबर क्राईममुळे होतोय महिलांना त्रास – खा.सुप्रिया सुळे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | सध्या सर्व काही ऑनलाइन सुरु झाल्यामुळे सायबर क्राईमचा धोका प्रचंड वाढत आहे. यात महिलांना सायबर क्राईमचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

महिलांना सध्या सर्वाधिक सायबर क्राईमच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या त्रासापासून वाचवण्यासाठी त्यांना एकत्र आणणे गरजेचे आहे. असे लोकसंवाद फाउंडेशनच्या ऑनलाईन संवाद सत्रात खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्याचबरोबर त्यांनी परिवर्तनवादी महाराष्ट्राची मागणीही केली आहे. हा उपक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवण्यात येतो. यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग वाढवणे गरजेचे आहे. यावेळी कृषी कायद्यावर संसदेत व्यापक चर्चा होण्याची गरज होती परंतु ही चर्चा न होता वेगळ्याच विषयात हात घालण्यात आला. उद्यापासून संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. यामध्ये हे प्रश्न उपस्थित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर शिक्षण हा अतिशय संवेदनशील आणि गंभीर विषय आहे. राज्य शासनाला सोबतच केंद्र शासनाने देखील हा विषय गंभीरपणे हाताळला पाहिजे. तात्कालीन आघाडी सरकारने विनाअनुदानितच्या अगोदर असलेला कायम हा शब्द काढला. सध्याचे महाविकास आघाडी सरकारने या विषयी सतर्क असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Leave a Comment