आंबोली घाटात बर्निंग कारचा थरार; चालत्या गाडीला आग लागून एका महिलेचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबोली घाटामध्ये ‘बर्निंग कार’चा थरार पाहण्यास मिळाला. या दुर्दैवी घटनेत कारचालकाच्या पत्नीचा जळून मृत्यू झाला आहे. तर पती थोडक्यात बचावला असून त्याच्यावर सावंतवाडी इथं उपचार सुरू आहे. दुंडाप्पा पद्मनावर असं या कारचालकाचे नाव आहे. हा बेळगावच्या पिरनवाडीचा रहिवासी आहे. गाडी संरक्षक कठड्याला धडकल्यानंतर पूर्णपणे जळून खाक झाली. तत्पूर्वी या गाडीने चौकुळ कुंभावडे इथं सत्यप्रकाश गावडे यांच्या कारला धबधब्याच्या अलीकडे धडक दिली होती. या धडकेनंतर घाबरून पळून जात असताना गाडीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याचं दुंडाप्पाच्या लक्षात आलं नाही. तोपर्यंत चालत्या गाडीने पेट घेतला होता.

या परिस्थितीत दुंडाप्पाने गाडीच्या बाहेर उडी मारली. गाडीतून उडी मारल्यानंतर गाडी समोरील संरक्षक कठड्याला जाऊन आदळली तोपर्यंत गाडीने पूर्ण पेट घेतला होता, असं त्यावेळी समोरून येणाऱ्या वाहनचालकांनी सांगितलं. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, त्याच्या पत्नीला वाचवणे शक्य नव्हतं. त्यामुळे त्याची पत्नी अक्षरश: जळून खाक झाली.आंबोली घाटातील मुख्य धबधब्याच्याजवळ ही घटना घडली. दुंडाप्पा आपल्या पत्नीसह आंबोलीवरून सावंतवाडीच्या दिशेने वॅग्नार कारने जात होता. नेमकं त्यावेळी कार अपघातग्रस्त झाल्यानंतर पेट घेतल्याने जळून खाक झाली. गाडीने पेट घेतल्यानंतर दुंडाप्पाने गाडीतून उडी घेतली तर पत्नी सीटबेल्ट लावले असल्यामुळे तिला स्वतःच्या प्राण वाचवता आला नाही. तसेच कार लॉक झाल्याने महिलेचा होरपळून मृत्यू झाला.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment