Women Fighting : केस ओढले, कानफाडात दिली..!! बसमधील फ्री सीटसाठी दोन बायकांमध्ये मारामारी; VIDEO व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Women Fighting) जगभरातील बरेच लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून अनेक ठिकाणी प्रवास करत असतात. आपल्या देशात सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचे वापरकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीत मारामारीच्या कित्येक घटना दररोज घडत असतात. अशा ट्रेन, बस किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक वाहनांमध्ये अशा घटना घडतात. ज्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतात. दरम्यान, सीटवरून भांडणे तुम्ही पाहिली असतील. अशाच एका भांडणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे.

व्हायरल व्हिडीओ (Women Fighting)

बरेच लोक रोज बस आणि ट्रेनने प्रवास करतात. हे प्रवास गर्दीचे असल्यामुळे अनेकदा बसायला जागा मिळवण्यावरून वाद होत असतात. बाचाबाचीपासून सुरु होणारी ही भांडणं कधी हाणामारीवर पोहोचतात समजतसुद्धा नाही. असेच काहीसे या व्हिडिओत पहायला मिळत आहे. भरधाव येणाऱ्या बसमध्ये दोन महिलांमध्ये चांगलीच जुंपल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. माहितीनुसार, या दोन्ही महिला ‘मोफत बस सीट’वरून भांडत आहेत. दोघीही तारतम्य सोडून एकमेकींना भिडल्याचे यात दिसत आहे.

बसमधील मोफत सीटवरून राडा

सोशल मीडियावर व्हायरल होणार हा व्हिडीओ तेलंगणातील असून एका मोफत सीटसाठी दोन महिला प्रवासी एकमेकींसोबत भांडताना दिसत आहेत. या व्हिडीओत दिसतंय, बसमधील फ्री सीटवर बसण्यासाठी या महिलांमध्ये वाद सुरू आहेत. यावेळी भांडताना दोन्ही महिलांचा पारा प्रचंड चढला आहे. एकमेकींचे केस ओढणे, कानफाडात लगावणे ते कपडे ओढण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याचे आपण पाहू शकतो. (Women Fighting) दोघींचा संताप इतका जास्त होता की, बसमधील ड्रायव्हर, कंडक्टर आणि अगदी सह प्रवाशांनीसुद्धा हस्तक्षेप करण्याची तसदी घेतली नाही. मात्र, उभ्या उभ्याने नुसता ड्रामा काय पहायचा? म्हणून काही प्रवाशांनी सदर घटनेचा व्हिडीओ केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

युजर्सचे मत

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ TeluguScribe नावाच्या X हॅण्डलवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ अनेकांनी पाहिला असून यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Women Fighting) आतापर्यंत एक लाख ७३ हजारांहून जास्त व्ह्युज मिळालेल्या या व्हिडिओवर अनेक युजरने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ‘कोणतीही सुविधा एकतर्फी असता काम नये.. प्रत्येक सुविधेवर प्रत्येकाचा समान हक्क हवा’. तर आणखी एकाने म्हटले, ‘मुळात महिलांना मोफत सीटची सुविधा नसावी, म्हणजे असे प्रकार घडण्याची शक्यता कमी होईल’.