हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जीवनामध्ये आश्चर्याचा धक्का कोणत्याही वेळी बसू शकतो असे म्हटले जाते. असाच एक आश्चर्याचा सुखद धक्का सध्या जग अनुभवत आहे. आफ्रिका खंडातील माली या छोट्याशा देशातील एका महिलेने 1 नाही, 2 नाही तर तब्बल नऊ बाळांना जन्म दिला आहे. यामुळे सध्या यावर संशोधन आणि मोठी चर्चा होताना दिसून येत आहे.
माली देशातील एएफपी या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीमध्ये बातमीनुसार, 25 वर्षीय हलिमा सीसी या महिलेला या महिलेने 9 अर्भकांना जन्म दिला आहे. प्रसूतीच्यासाठी चांगली सुविधा मिळावी म्हणून शासनाने तिला पश्चिम-आफ्रिकेतील तिच्या मूळ शहरामधून मोरक्कोमधील एका चांगल्या रुग्णालयात दाखल केले होते. सुरुवातीला अल्ट्रासाउंड चाचणी केली त्यावेळी तिच्या पोटामध्ये सात गर्भ असल्याचे दिसून आले होते. त्यावेळी सात गर्भ कांचा गर्भाचा अंदाज डॉक्टरांनी केला होता. पण, अचानक प्रसूतीच्या वेळी 9 बाळांना जन्म दिल्यामुळे सगळीकडे आश्चर्याचे वातावरण आहे.
या महिलेने जन्म दिलेल्या नऊ बालकांपैकी पाच मुली आणि चार मुले असून या महिलेचा सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्यात आली आहे. सध्या या महिलेची आणि तिच्या बाळाची प्रकृती ठीक असून लवकरच त्यांच्या प्रकृतीमध्ये अजून जास्त प्रमाणात सुधारणा घडेल. असे डॉक्टरांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आतापर्यंत आपण जुळे अथवा तीळे बालकांचे एकावेळी जन्म पाहिले होते. परंतु तब्बल नऊ बाळांना जन्म दिल्याची घटना हि पहिल्यांदाच पाहत असल्यामुळे, अनेकांनी ही घटना दुर्मिळ असल्याचे म्हटले आहे.