हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवादा जिल्ह्यातील वारिसलीगंज पोलिस स्टेशन परिसरातील चांदीपुर गावात हुंड्यासाठी विवाहितेची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृताच्या सासरच्यांनी हुंड्यामध्ये मोटारसायकलची मागणी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. जेव्हा मागणी पूर्ण झाली नाही, तेव्हा सासरच्यांनी तिची हत्या केली. या महिलेच्या माहेरच्या लोकांनी मृताच्या पती आणि सासरच्या लोकांवर खुनाचा आरोप केला आहे. सध्या पोलिसांनी संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला आहे.
मृताचा भाऊ बालेश्वर ठाकूर यांनी सांगितले की त्याने आपल्या बहिणीचे शिवदानी ठाकूरशी धामधूम लग्न केले पण सर्व लोकांनी आमच्या बहिणीच्या अन्नात विष दिल, त्यानंतर आमच्या बहिणीला बराच काळ छळन्यात आलं पण कोणीही मदतीसाठी पुढे झाले नाही. जेव्हा आम्हाला याची माहिती झाली तेव्हा आम्ही थेट आमच्या बहिणीच्या घरी गेलो आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले जिथे आमच्या बहिणीचा मृत्यू झाला.
त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, ‘पूर्ण कुटुंबाने आमच्या बहिणीला एकत्रपणे मारून टाकले आहे. आमच्या बहिणीच्या लग्नानंतर ते सतत हुंडा म्हणून मोटारसायकलची मागणी करत असत. मोटारसायकलसाठी तिचा नेहमी छळ केला जात होता. तिला नेहमी त्रास दिला जात होता. मोटारसायकल न दिल्यामुळे आमच्या बहिणीला विष देऊन मारण्यात आले’.