मुलानं आईला प्रियकरासोबत पाहिलं, आईनं प्रियकराच्या मदतीनं थेट मुलालाच संपवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना मध्य प्रदेशातील डिंडोरी जिल्ह्यामध्ये घडली आहे. एका अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुलाच्या आईला अटक केली आहे. २ ऑगस्ट रोजी समनापूर ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली होती. सोनूचा मृत्यू प्रकृती अस्वस्थामुळे झाल्याचा दावा कुटुंबीयांकडून करण्यात आला होता. सोनूच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले होते.

पण सोनूच्या आजोबांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन सोनूची हत्याचा झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. यामध्ये त्यांनी सोनूच्या आईवर संशय व्यक्त केला आहे. यानंतर पोलिसांनी कोर्टाची परवानगी घेऊन अल्पवयीन मुलाचा जमीनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढला आणि त्याचं पोस्टमार्टम करण्यात आलं. यामध्ये सोनूचा मृत्यू नैसर्गिक नसून त्याची हत्या करण्यात आल्याचं सिद्ध झालं. सोनूच्या डोक्यावर एक मोठा घाव दिसून आला आहे.

आईनं गुन्हा केला कबुल
पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली.यात मृत्यू झालेल्या सोनूच्या आईची चौकशी केली आणि सगळ्या प्रकरणाचा उलघडा झाला. पोलिसांनी आरोपी आईच्या प्रियकरालासुद्धा अटक केली आहे. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा मान्य केला आहे. मुलानं प्रियकरासोबत आपत्तीजनक परिस्थितीत पाहिल्यानं आई आणि प्रियकरानं मिळून मुलाची हत्या करण्याचा निर्णय घेतला. यानंतर या दोघांनी मुलाच्या डोक्यावर लाकडाच्या ओंडक्यानं जोरदार हल्ला केला आणि यातच या मुलाचा मृत्यू झाला. यानंतर या दोघांनी मिळून मुलगा सोनूचा मृतदेह जमिनीत गाडला होता.

Leave a Comment