CAA विरोधात महिलांचा जाफराबाद मेट्रो स्टेशनवर ठिय्या; पोलिसांना अतिरिक्त फौजफाटा तैनात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागरिकत्व सुधारणा कायद्याला मुस्लिम समाजाकडून होणारा विरोध वाढतच चालला आहे. देशभरातील मुस्लिम बांधवांकडून या कायद्याचा निषेध व्यक्त केला जात असून शांततापूर्ण मार्गाने गेल्या काही दिवसांपासून आंदोलने करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

दिल्लीतील शाहीनबाग आंदोलनाला २ महिने पूर्ण होत असताना आता काही महिला आणि युवकांनी मेट्रो स्टेशनही लक्ष करुन त्याठिकाणी आपला निषेध नोंदवायला सुरुवात केली आहे. दिल्लीमधील जाफराबाद स्टेशनला १००० पेक्षा अधिक आंदोलकांनी एकत्र येत रास्ता रोको केला. यामुळे वाहतूक प्रशासनावर ताण पडल्याचं पाहायला मिळालं. मेट्रोला थांबण्यात अडथळा येऊ लागल्यामुळे वेगात येणाऱ्या मेट्रोनी इथला थांबा न घेताच पुढे जाण्याला प्राधान्य दिलं.

 

या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अतिरिक्त फौजफाटा तैनात करावा लागला. आंदोलकांमध्ये महिलांची संख्या मोठी होती. यावेळी आझादी आणि इंकलाब जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

Leave a Comment