Tuesday, October 4, 2022

Buy now

भर रस्त्यात महिलांना लाथा-बुक्याने बेदम मारहाण, धक्कादायक Video आला समोर

बारामती : हॅलो महाराष्ट्र – बारामतीमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. यामध्ये एका महिलेला लोकांकडून बेदम मारहाण (brutal beating) करण्यात येत आहे. या मारहाणीचा (brutal beating) व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर लोकांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. हि घटना बारामती शहरातील खंडोबा नगर परिसरामध्ये घडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
खंडोबा नगर परिसरात राहणाऱ्या काही लोकांचा डुक्कर पाळण्याचा व्यवसाय होता. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात डुक्करांमुळे दुर्गंधी पसरत होती. वारंवार सांगूनही स्वच्छता काही राखली जात नव्हती. त्यामुळे स्थानिक लोकांनी पोलीस स्टेशनला आणि नगर परिषदेमध्ये तक्रारी अर्ज दाखल केला होता. यासंदर्भात नगर परिषदेमध्ये आणि पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली होती. तक्रार दिल्याचा राग मनात धरून डुक्कर पाळणाऱ्या लोकांनी या महिलेला बेदम मारहाण (brutal beating) केली आहे.

ही संपूर्ण मारहाणीची घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मारहाण (brutal beating) करणाऱ्या व्यक्तींविरोधात शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींविरोधात पोस्को विनयभंग दरोडा या स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या मारहाणी (brutal beating) प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या घटनेचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले असून या नराधमांना अटक करण्याची मागणी लोकांकडून करण्यात येत आहे.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?

Related Articles