महिलांना या योजनेतंर्गत मिळणार दरमहा 7 हजार रुपये; त्वरीत करा अर्ज

LIC Scheme
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ करण्यासाठी LIC ने “विमा सखी” (Vima Sakhi) योजना सुरू केली आहे. गेल्या 9 डिसेंबर 2024 रोजी पानिपत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. खास म्हणजे, फक्त एका महिन्यात देशभरातील 52,511 महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल आहे. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला या योजनेची माहिती देणार आहोत.

विमा सखी योजना काय आहे?

“विमा सखी” योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक सहाय्य करण्याचा आहे. या योजनेत महिलांना ३ वर्षांचे प्रशिक्षण देऊन LIC एजंट बनवले जाते. प्रशिक्षणादरम्यान महिलांना पहिल्या वर्षी दरमहा 7,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये मानधन दिले जाते. यासाठी अर्ज करणाऱ्या महिलांनी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

योजनेसाठी अर्ज कसा करावा?

ज्या महिलांना या योजनेचा भाग व्हायचे आहे त्यांनी एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज दाखल करावा. महत्वाचे म्हणजे 18 ते 70 वयोगटामधील महिलाच या योजनेसाठी अर्ज करू शकतात. तसेच अर्ज करणाऱ्या महिलांचे दहावीपर्यंत शिक्षण झालेले हवे.