विविध क्षेत्रात भरारी घेणाऱ्या महिलांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान
प्रतिनिधी कराड | सकलेन मुलाणी
महिला दिनानिमित्त कराड मध्ये नारीशक्तिंचा सिक्किम चे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मान करण्यात आले. यावेळी पाटील म्हणाले तेरा वर्षापूर्वी एसजीएम कॉलेज समोरील एका कट्टयावर सुरू केलेल्या यशवंतनगरीचा न्यूज चॅनेलचा विकास झाला असल्यामुळे लोकांच्या मनामनात स्थान निर्माण केले आहे. प्रत्येक क्षेत्रातील महिलेचा याठिकाणी होणारा गौरव हा नारीशक्तीचा सन्मान असल्याचे उदगार माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी काढले. यावेळी कांताताई मुलचंद डोंगरे याना यशवंत जीवन गॊरव तर विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगीरी केलेल्या १६ महिलांचा यशवंत गॊरव पुरस्कार. देउन सन्मान करण्यात आला.
कराड येथील यशवंत नगरी न्यूज नेटवर्क आयोजित यशवंत गौरव पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जेष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, प्राणा फौऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्राची पाटील, कराड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक चव्हाण, प्रसार माध्यम संपादक परिषेदेचे अध्यक्ष गोरख तावरे, सुभाष एरम, दिलीप गुरव, यशवंत नगरीचे संपादक विकास भोसले, स्वाती भोसले, रूपाली जाधव, सागर दडवंते आदी उपस्थित होते.
डॉ. उदय निरगुडकर म्हणाले, महिलांना मिळालेला सन्मान तिच्या कतृत्वामुळे मिळत आहे. आजच्या पुरस्कार प्राप्त महिलांनी अत्यंत कष्टातून आपले यश मिळविले आहे. त्यामुळे पुरस्कार मिळवण किंवा यश मिळवण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो.
या कार्यक्रमाचे आकाश पाटील यांनी सुत्रसंचालन केले. विकास भोसले यांनी प्रास्ताविक केले. रूपाली जाधव यांनी आभार मानले.