त्रास देणाऱ्या नशेखोर मुलांना रणरागिणींनी दिला बेदम चोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे 

सांगलीतल्या 100 फुटी रोडवर असणाऱ्या चेतना पेट्रोल पंपावर काही नशेखोर तरुणांकडून महिला कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचे काम सुरु होते. दहा ते वीस रुपयांचे पेट्रोल टाकण्यावरून हे तरुण इथल्या महिला कर्मचाऱ्यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत होते. अखेर राग अनावर झाल्यानंतर या महिला रणरागिणींनी नशेखोर तरुणांना बेदम चोप दिला.

सदरची घटना हि शनिवार दि. 16 एप्रिल रोजी सायंकाळी घडली. या तरुणांनी महिलांच्या तावडीतून पळ काढला. मात्र, नशेखोर तरुणांकडून आता थेट महिलांना शिवीगाळ करण्याचे प्रकाश सुरु झाल्याने शहरात कायदा व सुव्यवस्था आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सांगली शहरात गेल्या काही दिवसांपासून नशेखोर तरुणांचा हैदोस झाला आहे. याच नशेतून अनेक खून, खुनी हल्ल्याचे प्रकार वाढले असतानाच आता महिलाही सुरक्षित नसल्याचे चित्र आहे. नशेच्या गोळ्यांचा वापर करून शहरातील गुन्हेगारी वाढत आहे, पोलीस यावर कारवाई का करत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Leave a Comment