जागतिक महिला दिन
भारतात अशा अनेक महिला आहेत ज्या स्वहिंमतीने आपापल्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत. आणि स्वतःच्या कर्तुत्वावर त्यांनी यश मिळवलेलं आहे. सामाजिक, राजकीय तंत्रज्ञान संशोधन अशा एक ना अनेक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. १९७५ पासुन हा दिवस जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो. यूनाइटेड नेशन्स ने ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून घोषित केला. ८ मार्च महिला दिवस म्हणून जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
जगभरातल्या महिलांच्या कार्याचा त्यांच्या जिद्दीचा सन्मान म्हणून गुगल ने आपल्या डुडल वर महिलाना हिंदी, फ्रान्स, इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये लिहून महिलांचा सन्मान केला आहे. गुगल गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या महत्वाच्या दिवसांना आणि जागतिक कीर्तीच्या व्यक्तिंचा आदर सन्मान म्हणून ही युक्ति वापरत आहे.
भारतात सुद्धा हा एक उत्सव तयार झाला आहे. या उत्सवात महिलांना ज्या काटेरी और प्रवासातून यश प्राप्त केल आहे. तो आनंद कोणत्याही पैशापेक्षा मोठा असल्याचं अनेक महिला मनोगत व्यक्त करतात.