हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| रेल्वे विभागाकडून (Railway Division) महिलांसाठी अनेक सोयी-सुविधा देण्यात येतात. परंतु या सोयी सुविधा नक्की कोणत्या आहेत? त्याचा फायदा कसा घ्यायचा? हे मात्र अद्याप महिलांना माहीत नाही. काही वेळा तर गरज असताना देखील या सोयी सुविधांचा लाभ महिलांना घेता येत नाही. कारण त्यांच्यापर्यंत या सुविधा पोहोचलेल्याच असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रेल्वेने प्रवास करताना महिलांसाठी कोणत्या सुविधा राबवल्या जातात हे सांगणार आहोत.
महिलांसाठी सुविधा (Facilities for women)
1) एखादी महिला रेल्वेने रात्रीच्या वेळी प्रवास करत असेल आणि तिच्याकडे तिकीट नसेल किंवा ते हरवले असेल तर त्यावेळी तिला रेल्वेमधून उतरवू शकत नाही. असे केल्यास ती महिला त्या व्यक्ती विरोधात तक्रार दाखल करू शकते.
2) स्लीपर कोचमध्ये सहा ते सात लोअर बर्थ, वातानुकूलित 3 टियर (3AC) मध्ये प्रति डबा 4 ते 5 लोअर बर्थ, तसेच वातानुकूलित 2 टियर (2AC) मध्ये प्रति डबा 3 ते 4 लोअर महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेले असतात. 45 पेक्षा अधिक वय असलेल्या महिलांना लोअर बर्थची सेवा देण्याची तरतूद सरकारकडून करण्यात आली आहे.
3) जास्त स्थानकावर तिकीट काढण्यासाठी महिला प्रवाशांसाठी स्वातंत्र्य काऊंट नसते तिथे महिलांना सामान्य रांगेत उभे राहण्याची गरज पडत नाही.
5) महिला प्रवाशांना मेल आणि एक्सप्रेस ट्रेनमध्ये अनारक्षित श्रेणीतून प्रवेश करता येवू शकतो. भारतीय रेल्वे विभागाकडून खास महिलांसाठी विशेष ट्रेन देखील सोडल्या जातात. याची माहिती महिलांनी घेणे आवश्यक आहे.
6) रेल्वे स्थानकांवर महिला प्रवाशांसाठी वेटिंग रूम किंवा हॉलची वेगळी सुविधा आहे. याठिकाणी महिलांना वेगळे स्वच्छतागृह देखील असणे आवश्यक आहे.
7) महिला प्रवाशांसाठी रेल्वेने हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे. 182 या नंबर वर फोन करून रात्री किंवा दिवसा महिला सुरक्षितेसाठी मदत मागू शकतात. रात्रीच्या वेळी कोणी तुमची छेड काढत असेल तर तुम्ही थेट या नंबरवर फोन करून मदत मागू शकता.
8) रेल्वे विभागाकडून महिलांसाठी मेरी सहेली ही मोहीम राबवली जाते. या मोहिमेंतर्गत पोलीस महिला महिला प्रवाशांची चौकशी करतात त्यांना कोणती अडचण आहे का हे विचारतात. सध्याही सुविधा लांब जाणाऱ्या गाड्यांमध्ये उपलब्ध आहे.