कामबंद : कराड उपजिल्हा रूग्णालयात सफाई कामगार चार महिन्यांपासून पगाराविना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी कामगारांची होणारी पिळवणूक होत आहे. तसेच ठेकेदारावर कारवाईसह अन्य मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे कामगारांनी सांगितले. गेल्या चार महिन्यापासून कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना पगार दिलेला नसल्याने कामबंदचा पवित्रा घेतला आहे.

येथील उपजिल्हा रूग्णालयात म्हात्रे (गरूडझेप) नामक कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून कंत्राटी कामगारांची फसवणूक व पिळवणूक केली जात आहे. या रुग्णालयांमध्ये मामा- मावशी म्हणून काम करणारे कंत्राटी कामगार गेले, सहा वर्ष झाले काम करतात. परंतु या संबंधित कामाचा पगार त्यांना वेळेवर दिला जात नाही. पाच हजार रुपये याप्रमाणे पगार केला जातो. परंतु त्यात पाच हजारांमध्ये फिनेल, झाडू, ब्रश, पावडर, बादली मग इत्यादी साहित्य कामगार मामा मावशीला आणण्यासाठी भाग पाडले जाते. संबंधितांना ठेकेदारांकडून दमदाटी केली जाते.

संबंधित ठेकेदार हा महिलांना अरेरावी करत असतो. सातत्याने संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष दादा साहेब अोव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया यांनी दिला आहे.

आम्ही गेल्या सहा वर्ष काम करत आहोत. कोरोनाच्या काळात आम्ही काम केले, मात्र कोणतीही सुविधा दिलेली नाही. आम्हांला कधीही वेळेत पगार दिला नाही. गेले चार महिने झाले पगार मिळाला नाही. ठेकेदाराने आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय कामावर हजर होणार नसल्याची भूमिका कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.