मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर गावी परतण्यासाठी कामगारांची धडपड; बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी

औरंगाबाद | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी पुढील काही दिवसासाठी ब्रेक द चेन अंतर्गत बुधवारी रात्री पासून कडक निर्बंध लागू केले आहे. त्यानंतर औरंगाबादेत काम करणारे कामगार आपल्या मूळगावी जाण्यासाठी बसस्थानकावर गर्दी करीत असल्याचे चित्र आज पाहायला मिळाले.

आज रात्रीपासून कडक निर्बंध लागू होणार असल्याने रेल्वे स्थानक, बस स्थानकावर देखील मोठी गर्दी पाहायला मिळत असून औरंगाबादेत वास्तव्यास असलेले नागरिकांसह परिवार मूळगावी परतत आहेत.

गेल्या लॉकडाऊन मध्ये इतर तालुके,जिल्ह्यातून औरंगाबादेत रोजगारासाठी आलेल्या कामगार,मजुरांची फरपट झाली होती. आता ती फरपट या लॉकडाऊनमध्ये होऊ नये. यासाठी लॉकडाऊन लावण्यापूर्वी घराची वाट हे कामगार धरताना दिसत आहे. त्यामुळे आज मध्यवर्ती बसस्थानक परिसरात चांगलीच वर्दळ पाहायला मिळाली.

You might also like