मुंबई ते गुलबर्गा | ५५० किलोमीटर अंतरावरील आपल्या लहान मुलांपर्यंत पोहचण्याचा बिगारी कामगारांचा प्रवास पुण्यातच थांबतो…तेव्हा…???

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शहरं जगवणाऱ्या माणसांची व्यथा | तुषार कलबुर्गी

बांद्र्याच्या खेरवाडीहून गुलबर्ग्याच्या बेनकीपली गावाकडं १५ बिगारी कामगार चालत निघाले. २९ मार्चला संध्याकाळी पुण्याच्या खडीमशीन चौकापर्यंत पोहचेले. खडीमशीन चौकात पोलिसांनी त्यांना अडवलं आणि जवळील महानगरपालिकेच्या शाळेत सोडलं. २९ मार्चपासून महानगरपालिकेच्या शाळेत ही लोकं राहत आहेत. याठिकाणी त्यांची जेवणाची सोय केली आहे. विविध संस्था त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करत आहेत. पण या परिस्थितीत त्या कुटुंबांना वेगळीच चिंता सतावतेय. ही चिंता आहे गावी असलेल्या आपल्या मुलांची..!! त्यांची मुलं गावामध्ये एकटीच आहेत. मुलांच्या शाळा सुरू होत्या तेव्हाच शेजाऱ्यांच्या भरवश्यावर गाव सोडून ही लोकं मुंब‍ईला कामाला आली होती. लाॅकडाऊननंतर या कामगारांची आपल्या मुलांबद्दलची चिंता वाढली आहे.

लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर रोजंदारीवर जगणाऱ्या अनेक बिगारी कामगारांची आबाळ झाली. अनेक मजूर रस्त्यावर आले. गुलबर्ग्याच्या बेनकीपली या गावातून ५ कुटुंब बांद्र्याच्या खेरवाडीमध्ये बिगारी कामासाठी आले होते. लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर त्यांचे काम बंद पडले. त्यानंतर २ दिवस कसेबसे मुंब‍ईत काढून आपल्या गावाचा रस्ता पकडून ते चालत निघाले. हा प्रवास आधी चालत आणि मग रस्त्यावरुन जाणाऱ्या टेम्पो आणि ट्रकमध्ये थोड्या थोड्या अंतराचा आसरा घेत चालू होता. सुमारे १६० किलोमीटरचा प्रवास करत ४ दिवसांनी हे लोक पुण्यात पोहोचले. पुण्यामध्ये खडीमशीन पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दादाराजे पवार यांनी या लोकांना ताब्यात घेतलं. शासनाच्या नियमाप्रमाणे जवळच्याच बापूसाहेब दरेकर शाळेत त्यांची निवासाची आणि जेवणाची सोय करण्यात आली. पोलिसांनी पकडल्यानंतर, “आम्हाला कसंतरी करून आमच्या गावाला पोहचवा” अशी मागणी करताना बिगारी कामगारांचा जीव काकुळतीला आला होता.

त्यांच्यापैकी पुतळाबाई हरिसिंग राठोड म्हणाल्या,

“हम कारपेंटरी का काम करने के लिए मुंबई आये थे। लेकिन तालाबंदी के बाद काम बंद हो गया। गाँव जाने के लिए कोई बस ट्रेन नहीं मिली। दो दिनों के बाद, हमने गाँव की तरफ पैदलही चलना शुरू किया। पुना आने के बाद, हमें पुलिस ने पकड लिया और हमें स्कूल लाया गया। यहां हमारे खाने और रहने का इंतजाम किया है, लेकिन हमारे बच्चे गाँव मे कैसे होंगे ये सोचकर हम खाना भी ठीक से नहीं खा सकते हैं। बच्चों से फोन पर बात करें, तो बच्चे फोनपरही रो पडते है अौर हमेंभी रोना आता है। कुछ भी करके हमें हमारे बच्चोंके पास भेजने का इंतजाम करो यही प्रशासनसे मांग है।”

हे सांगतानाही पुतळाबाईंचे डोळे पाणावले होते. गोविंद प्रभू राठोड म्हणत होते,

“इस वक्त हमारे बच्चे कैसे होंगे, यह बात बारबार हमारे दिमाग में आती है। हमसे यहां रहा नहीं जाता। गाँव में बच्चो को पड़ोसी खाना खिलाते हैं, लेकिन बच्चे दिनभर रो रहे हैं। हमें अपने बच्चों के पास जाना है। हम सब १५ लोग एकही गाँव के है. हमारे लिए एक बस की व्यवस्था करायी जाये”।

देशभरात सध्या लाॅकडाऊन आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करण्यास मनाई आहे. पण अशी परिस्थिती आणखी किती दिवस राहील सांगता येत नाही. दूर अंतरावरील प्रत्येकालाच आपल्या जवळच्या लोकांना भेटण्याची ओढ लागली आहे. आता आणखी किती दिवस हे कुटुंब आपल्या मुलांपासून वेगळं रहाणार? लॉकडाऊनआधी परदेशातून भारतीयांना भारतात सुखरूप आणलं गेलं होतं. दिल्लीतून उत्तरप्रदेशमध्ये जाणाऱ्या कामगारांसाठीही बसची सोय करण्यात आली होती. आपल्या लहान मुला-बाळांच्या आठवणीने तडफडणाऱ्या या गरीब कुटुंबांना गावाला पोहचविण्याची सोय केली गेली जाईल का? या प्रश्नाचं उत्तर आता प्रशासन आणि सरकारच देऊ शकतंय.

तुषार कलबुर्गी हे पत्रकार असून असंघटित क्षेत्रातील कामगारांचा सध्या ते विशेष संदर्भाने अभ्यास करत आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक – 7448149036

Leave a Comment