World Athletics Championships : भारताला मोठा धक्का! अविनाश साबळेचं स्वप्न भंगलं

Avinash Sable
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – अमेरिकेत सुरू असलेल्या वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या अविनाश साबळेचा (Avinash Sable) पराभव झाला आहे. त्यामुळे त्याचे वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. यामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. मूळचा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील अविनाश साबळे (Avinash Sable) अडथळा शर्यतीच्या फायनलमध्ये 8 मिनिट 31.75 सेकंद वेळ नोंदवून 11 वा आला. जी त्याच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीपेक्षा (8 मिनिटं 12.48 सेकंद) पेक्षा बरीच कमी होती. याचा फटका त्याला बसला आणि त्याचा फायनलमध्ये पराभव झाला.

वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपस्पर्धेच्या इतिहासात आजवर भारताकडून या स्पर्धेत फक्त अंजू बेबी जॉर्जनं 2003 साली मेडल जिंकलं होतं.19 वर्षानंतर या ऐतिहासिक कामगिरीची बरोबरी करण्यात अविनाशला अपयश आले. 27 वर्षांचा अविनाश (Avinash Sable) सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता. त्यानं जून महिन्यात झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत 8 मिनिट 12.48 सेकंद वेळ घेत स्वत:चाच रेकॉर्ड तोडला होता. यापूर्वी त्यानं 8 मिनिटे 16 सेकंद अशी सर्वोत्तम कामगिरी केली होती.

यावेळी अविनाशने (Avinash Sable) तब्बल 4 सेकंद कमी वेळ घेत नवा रेकॉर्ड केला होता. तसेच त्याने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेल्या खेळाडूला देखील मागे टाकले होते मात्र त्यावेळी त्याला फायनलमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले होते. या टोक्यो ऑलिम्पिकनंतर त्याला कोरोना झाला आणि त्याचा मोठा परिणाम त्याच्या सरावावर झाला.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर

आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!

IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार

‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर