कोरोना संकटात जागतिक बँकेकडून भारताला मोठी मदत; दिले ‘इतके’ कोटी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक जागतिक संघटना आता मदतीसाठी पुढे आल्या आहेत. जागतिक बँकेने भारताला मोठी आर्थिक मदत केली आहे. जागतिक बँकेने भारताला तब्बल एक बिलियन डॉलरचं पॅकेज जाहीर केले आहे. हे सामाजिक संरक्षण पॅकेज आहे. यापूर्वी कोरोनाशी युद्धासाठी ब्रिक्स देशांच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेने आपत्कालीन मदत म्हणून एक अरब डॉलरची मदत जाहीर केली होती.

जागतिक बँकेचे एक अब्ज डॉलरचे (सुमारे ७६०० कोटी) पॅकेज देशातील कोरोना रुग्णांच्या चांगल्या तपासणीसाठी, कोविड रुग्णालयांचा दर्जा वाढवण्यासाठी तसेच प्रयोगशाळेसाठी इमारत बांधण्यासाठी वापरले जाऊ शकते. जागतिक बँकेने यापूर्वी २५ विकसनशील देशांना पॅकेज देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. याआधी न्यू डेव्हलपमेंट बँकेने भारताला एक अब्ज डॉलर्सची आपत्कालीन मदत जाहीर केली. कोविड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी आणि कोरोना विषाणूच्या साथीमुळे होणारे मानवी, सामाजिक व आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी हे कर्ज देण्यात आलं होतं.

याव्यतिरिक्त, एशियन डेव्हलपमेंट बँकने (एडीबी) कोरोनाच्या संकटात भारताला १.५ अब्ज डॉलर्सचे पॅकेज जाहीर केले होते. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि कोरोनो विषाणूमुळे होणारे मानवी, सामाजिक व आर्थिक नुकसान कमी करण्याच्या लढाईत भारत सरकारला सामील करणे हे त्याचे उद्दीष्ट आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment