World Consumer Rights Day 2024 : ग्राहकांनो, हे 5 अधिकार तुम्हांला माहिती असायलाच हवेत; चला जाणून घ्या

World Consumer Rights Day 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

World Consumer Rights Day 2024 : दरवर्षी 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो. ग्राहकाला त्याच्या हक्कांची जाणीव व्हावी हा यामागील मुख्य उद्देश आहे. टीव्हीवर सुद्धा अनेकदा तुम्ही जागो ग्राहक जागो अशी जाहिरात बघितली असेल. बाजारातील महत्वाचा घटक असलेल्या ग्राहकांना त्याचे हक्क माहित असावेत आणि त्याच्या अधिकारांची जाणीव व्हावी यासाठी आपण 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करतो. या खास दिवसानिमित्त आज आम्ही तुम्हाला ग्राहकांचे असे काही अधिकार सांगणार आहोत जायची माहिती तुम्हाला असं अत्यंत आवश्यक आहे.

माहिती मिळण्याचा अधिकार

कोणत्याही उत्पादनाची किंवा सेवेची शुद्धता, किंमत आणि गुणवत्ता मानकांशी संबंधित प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येक ग्राहकाला आहे. वस्तूंबाबत कोणताही प्रश्न विचारल्यास दुकानदार तुम्हाला नकार देऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही जी वस्तू खरेदी करणार आहात त्याबद्दल तुम्हाला हवी ती माहिती तुम्ही सदर दुकानदाराला विचारू शकता.

वस्तू निवडण्याचा अधिकार- World Consumer Rights Day 2024

ग्राहकांना देण्यात आलेल्या या या अधिकारांतर्गत तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही वस्तू निवडू शकता. सर्व प्रकारच्या वस्तू बघितल्यानंतर ग्रखं त्याला हवी ती वस्तू खरेदी करू शकतो. कोणताही दुकानदार त्याला कोणतेही विशिष्ट उत्पादन किंवा सेवा खरेदी करण्यास भाग पाडू शकत नाही. हीच वस्तू घ्या अशी बळजबरी कोणताही दुकानदार त्याच्या ग्राहकाला करू शकत नाही.

सुरक्षिततेचा अधिकार

कोणतीही वस्तू खरेदी करताना आपण तिचे फायदे तोटे पाहत असतो. आपल्यासाठी सदर वस्तू सुरक्षित आहे का? हे आपण चेक करत असतो. याचे कारण म्हणजे ग्राहकांना मिळालेला सुरक्षिततेचा अधिकार… या अधिकारांतर्गत कोणताही दुकानदार आपल्या ग्राहकाला निकृष्ट दर्जाची कोणतीही वस्तू देऊ शकत नाही. अशी कोणतीही वस्तू दुकानदाराने दिली तर तुम्ही ती बदलून घेऊ शकता आणि जर दुकानदाराने ती वस्तू बदलण्यास नकार दिला तर तुम्ही त्याच्याविरुद्ध तक्रार करू शकता.

सुनावणीचा अधिकार

जर कोणत्याही दुकानदाराने ग्राहकाशी गैरवर्तन केले किंवा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय केला, उलटसुलट उत्तरे दिली तर ग्राहक त्याच्याविरुद्ध न्यायालयात तक्रार करू शकतो. राईट टू हर्ड अंतर्गत त्याला सुनावणीचा अधिकार देण्यात आला आहे.

समस्या सोडवण्याचा अधिकार

ग्राहकाला त्याच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध तक्रार करण्याचा अधिकार (World Consumer Rights Day 2024) तर आहेच, परंतु एशिवाय वेळेवर निराकरण करण्याचाही अधिकार आहे. म्हणजेच ग्राहकांच्या खऱ्या तक्रारींचा योग्य निपटारा करण्याचा अधिकारही त्यात समाविष्ट करण्यात आला आहे.