अभिमानास्पद!! जागतिक कराटे चॅम्पियनशिपमध्ये साताऱ्याच्या लुबान्सी सियानीने पटकावला आठवा क्रमांक

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा | जपान कराटे असोसिएशनने ऑनलाइन घेतलेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये साताऱ्याच्या लुबानसीं सियानी या विद्यार्थिनी नी नऊ वर्षाच्या आतील गटात आठवा क्रमांक मिळवला आहे. 155 देश या स्पर्धेत आनलाईन सहभागी झाले होते.

कराटेच्या जागतिक स्पर्धेत भारत देशातून लुबान्सी सियानी ही एकमेव स्पर्धक पहिल्या दहा मध्ये आठव्या क्रमांकावर विजयी झाली आहे ही देशासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. संपूर्ण lockdown मध्ये लुबान्सी ने ऑनलाइन शिकवणीतुन स्पर्धेची तयारी केली या यशाचे श्रेय तिने तिचे प्रशिक्षकांना दिला आहे.

दरम्यान, तिचे प्रशिक्षक विरेंद्र परदेशी यांनी मात्र लुबान्सीच्या यशाचे श्रेय तीच्या मेहनतीला दिल आहे. असुन अनपेक्षित यश मिळाले असुन lockdown मध्ये अनेक मुलांनी क्लास बंद केला मात्र लुबान्सी अनेक अडचणी असूनही एकही दिवस क्लास न बुडवताonline प्रशिक्षण घेत होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like