Tuesday, February 7, 2023

धक्कादायक ! जन्मदाती आई 4 दिवस दारूच्या पार्टीत गुंग,तिकडे बाळाचा भुकेने तडफडून मृत्यू

- Advertisement -

मॉस्को : वृत्तसंस्था – प्रत्येक आई आपल्या मुलासाठी जीवदेखील द्यायला तयार असते. आपण आज एका आईने जे कृत्य केले आहे ते ऐकून तुम्हालाही बसेल धक्का बसेल व त्या महिलेचा संताप येईल. या महिलेला आपल्या मित्रांसोबत दारु पार्टी करायची होती म्हणून तिने 11 महिन्याचा मुलगा आणि तीन वर्षांच्या मुलीला घरामध्ये कोंडून ठेवले होते. यामुळे चार दिवस भुकेने व्याकूळ झाल्याने मुलाचा मृत्यू झाला तर मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात महिला दोषी असल्याचा निर्णय कोर्टाने दिला.

या महिलेचे नाव ओल्गा बाजरोवा असे आहे. ओल्गा हि तिच्या पतीपासून वेगळी राहते. मित्रांसोबत दारु पार्टी करण्यासाठी तिने तिच्या मुलांना मृत्यूच्या दाढेत ढकलले. जवळजवळ ४ दिवस तिची मुले घरामध्ये बंद होती. या काळात तिने एकदाही आपल्या मुलांची चौकशी केली नाही. जेव्हा हि महिला पार्टी करुन घरी परतली तेव्हा तिच्या 11 महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाला होता. तर मुलगी बेशुद्ध पडली होती. यानंतर तिने मुलांच्या आजीशी संपर्क साधला. आजीने घरी येताच नातीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि ओल्गाच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर तिला अटक करण्यात आली.

- Advertisement -

अल्पवयीन मुलाची क्रुरतेनं हत्या करणे तसंच मुलीला धोकादायक अवस्थेत सोडून देत आईच्या कर्तव्याचे पालन करण्यास हलगर्जीपणा केल्याचा आरोप स्थानिक कोर्टाने ओल्गावर ठेवला होता. यावेळी ओल्गाने मुलांना मारण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता, तसेच या कृत्याचा आपल्याला पश्चाताप होत असल्याचा युक्तिवाद केला पण कोर्टाने हा युक्तिवाद फेटाळत ओल्गाला 14 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच तिचा पालकत्वाचा अधिकारदेखील रद्द केला आहे. कोर्टने मुलीचा ताबा तिच्या आजीकडे दिला आहे. हा सगळा प्रकार घडला तेव्हा ओल्गाचा नवरा लियोनिद बाजरोव देखील जेलमध्ये होता.