‘या’ एका चुकीमुळं टेनिस स्टार जेकोविचला US ओपनमधून काढले बाहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । रागाच्या भरात केलेली एक चूक किती महागात पडू शकते याचा चांगलचं प्रत्येय टेनिस स्टार नोवाक जोकोविचला आला आहे. जेकोविचला एका चुकीमुळं (Novak Djokovic) रविवारी यूएस ओपन (US Open Tournament) अतिशय वेगळ्यापद्धतीने बाहेर पडावं लागलं. US ओपनमध्ये एका सामन्यादरम्यान निराशेतून मारलेला बॉल महिला जजला लागल्याने स्पर्धेतून त्याला बाहेरचा रस्ता दाखवला गेला आहे.

प्री क्वार्टर फायनलमध्ये जोकोविच पहिल्या सेटमध्ये स्पेनच्या पाब्लो केरेना बुस्ता विरूद्ध ५-६ गुण मागे राहिला. या दरम्यान एक गुण गमावल्याच्या निराशेने जोकोविचने बॉल रॅकेटच्या बाहेर मारून कोर्टाच्या बाहेर फेकला. फेकलेला हा बॉल एका महिला जजच्या खांद्यावर लागला. या चुकीमुळे जोकोविचला यूएस ओपनमधून काढण्यात आलं.

https://www.instagram.com/p/CE0AzAOH2cp/?utm_source=ig_web_copy_link

स्टार जोकोविचबद्दल अमेरिकी टेनिस संघाने वक्तव्य जाहिर करून याची माहिती दिली आहे. ग्रँड स्लॅममध्ये हा नियम आहे की, कोणताही खेळाडू कोणत्याही अधिकाऱ्याला इजा करतो तर त्याच्याकडून दंड आकारला जाईल. आणि त्याला त्यामधून काढलं जाऊ शकतं. मॅच रेफरीने जोकोविचला यासाठी दोषी समजलं आहे. या घटनेनंतर जोकिवचने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. आणि एक पोस्ट शेअर केली आहे. जोकोविचच्या या चुकीमुळे प्री क्वार्टर सामन्यात त्याला जी राशी मिळाली आहे त्यामधून दंड आकारण्यात येईल. तसेच या चुकीमुळे त्याच्या रँकिंग प्वाईंटवर देखील परिणाम होणार आहे. जोकोविच हा जगातील नंबर १ चा खेळाडू आहे. पण त्याने केलेल्या या गोष्टीमुळे टूर्नामेंटमधून बाहेर केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment